नाते बँके पलीकडचे म्हणत, बँक ऑफ इंडिया गुरसाळे शाखेने जपली सामाजिक बांधिलकी !

माळशिरस (बारामती झटका)
बँक ऑफ इंडिया शाखा गुरसाळे, ता. माळशिरस, जि. सोलापूर, मौजे धर्मपुरी येथील शेतकरी स्वर्गीय संजयकुमार मुकुंदराव निगडे यांचे काही दिवसापूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले होते. त्यांचं स्वतःचं बँक ऑफ इंडिया शाखा गुरसाळे येथे बचत खाते होते. त्यांनी स्वतःची बँक ऑफ इंडिया मध्ये स्टार युनियन लाईफ इन्शुरन्स कंपनीची दोन लाखाची इन्वेस्टमेंट पॉलिसी केलेली होती. सदर मृत्यूची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी बँकेस कळवली. व त्यांनी सर्व कागदपत्रे बँकेत जमा केली. बँक ऑफ इंडिया शाखा गुरसाळेचे शाखा अधिकारी विठ्ठल पाटील यांनी स्वतः लक्ष घालून विमा क्लेम मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला. सदर वारसास २० लाख रुपये चा विमा क्लेम मंजूर होऊन सदर मृत्यूदाराचे वारस श्रीमती विद्या संजयकुमार निगडे यांना वीस लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
यावेळी धनादेश देताना उपस्थित बँक ऑफ इंडिया शाखा गुरसाळे तसेच नातेपुते शाखेचे वरिष्ठ शाखा प्रबंधक सुनील गावडे, बँक ऑफ इंडिया शाखेचे शाखाधिकारी श्रीयुत विठ्ठल पाटील तसेच स्टार युनियन लाईफ पॉलिसी इन्शुरन्स कंपनीचे डेप्युटी हेड अविनाश घाटे तसेच बँकेतील कर्मचारी उपस्थित होते.

बँकेने सामाजिक बांधिलकी जपत नाते बँकेच्या पलीकडचे या बँकेच्या ब्रीद वाक्याचा अर्थ अगदी सार्थ करून सामाजिक बांधिलकी जपली. बँकेमध्ये अशा नवीन खूप योजना आहेत, त्या ग्राहकांसाठी खूप फायदेशीर आहेत. तरी सर्व ग्राहकांनी अशा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील बँक ऑफ इंडिया शाखा गुरसाळे व नातेपुते शाखेच्या वतीने करण्यात आले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.