महाळुंग-श्रीपूर मधील एक बोलके लोकप्रिय नेते मौलाचाचा पठाण
श्रीपूर (बारामती झटका)
मौलाचाचा पठाण हे व्यक्तिमत्त्व सर्वांच्या परिचयाचे व सर्वात मिळुन मिसळून वागणारे आहे. या भागातील सर्व सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमात ते सहभागी असतात. महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा नगरसेवक निवडून आणण्यासाठी त्यांनी युवा नेते राहुल रेडे पाटील, रावसाहेब सावंत पाटील यांचेबरोबर व इतर राष्ट्रवादीचे या भागातील नेते कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन त्यांनी प्रचारात हिरीरीने सहभाग घेतला होता. त्यांनी केलेली सहज सोप्या भाषेतील खुमासदार भाषण अनेकांना आवडली.
नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी केलेले राजकीय भाष्य व निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतील, याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. मोहिते पाटील समर्थक आघाडी मधील दोन गटात ते एकमेकांची मते खातील. भाजपच्या उमेदवारांच्या मतांत घट होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सात ते आठ निवडुन येतील, असे त्यांचे म्हणणे होते. प्रत्यक्षात त्यांचे सहा उमेदवार निवडून आले. मौलाचाचा पठाण हे या भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बोलका आवाज आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही.
राष्ट्रवादीला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचेवर त्यांची निष्ठा आहे. या भागातील समस्या, तक्रारी संदर्भात मौलाचाचा रोखठोक बोलत असतात. विशेष म्हणजे ते निरक्षर आहेत. पण त्यांनी मुलगी, मुलगा डॉक्टर बनवले आहेत. सतत त्यांच्या डोक्यात अनेक वेगवेगळ्या कल्पना, विचार असतात. मोहिते पाटील यांचे ते कार्यकर्ते होते. पण, राजकीय बदल झाला ते राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करतात. आमदार बबनराव शिंदे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार रोहित पवार यांचे विश्वासातील ते आहेत.
त्यांनी लहानपणी गरीबी काय असते याचे चटके सोसले आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले कुटुंब सांभाळून आपले जीवन घडवले आहे. अडचणीतील गोरगरिबांना सहकार्य मदत मिळवून देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. महाळुंग-श्रीपूर परिसरात सर्व पक्ष, संघटना, नेते, कार्यकर्ते यांचेबरोबर त्यांचे जवळचे संबंध आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This article was very well-written and informative. Im curious about others’ opinions. Click on my nickname for more interesting reads!