Uncategorized

माऊलींच्या रिंगण सोहळ्याचे स्वखर्चाने जे. एम. म्हात्रे कंपनीने “सेवा” केली मात्र, पुरंदावडे ग्रामपंचायत हारगुच्छ देऊन बुक्का लावून “मेवा” खाणार.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या माळशिरस तालुक्यातील पहिल्या गोल रिंगण सोहळ्यास मैदान सज्ज झाले आहे.

पुरंदावडे (बारामती झटका)

कैवल्य साम्राज्य संत श्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पुणे, सातारा जिल्ह्यातील पायीवारी पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात आगमन होऊन पहिला मुक्काम नातेपुते येथे होत आहे. उद्या दि. 24 जून 2023 रोजी पुरंदावडे सदाशिवनगर येथे दुपारी माळशिरस तालुक्यातील पहिले गोल रिंगण असते.

माऊलीच्या रिंगण सोहळ्याचे स्वखर्चाने जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने माऊलींची सेवा म्हणून मुरूम माती टाकून सर्व मैदान सुसज्ज केलेले आहे. पुरंदावडे ग्रामपंचायत पालखी सोहळा प्रमुख लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी यांचा हार, गुच्छ देऊन बुक्का लावून सत्कार करून आलेल्या निधीचा वाटून मेवा खाणार, अशी खुमासदार चर्चा पुरंदावडे सदाशिवनगर परिसरात सुरू आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी महामार्गाचे धर्मपुरी ते खुडूस दरम्यान जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी पनवेल मुंबई यांनी महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम घेतलेले आहे. अनेक ठिकाणी जे. एम. म्हात्रे कंपनीने पालखी मार्गावरील वैष्णव वारकरी व भाविकांना त्रास व अडचण होऊ नये, यासाठी स्वखर्चाने अनेक ठिकाणी मशिनरी लावून मुरूम, माती टाकून काम केलेले आहे. पुरंदावडे येथील गोल रिंगण सोहळ्यास प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी अधिकाराचा वापर करून रिंगण सोहळ्याचे मैदान त्यांच्याकडून सुस्थितीत करून घेतलेले आहे. रिंगण सोहळ्यासाठी शासनाकडून निधी येत असतो, तो निधी कुठे व कसा खर्च होणार, याची चर्चा पुरंदावडे, सदाशिवनगर परिसरात सुरू आहे. पंचक्रोशीमधील सर्वांनी जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या मशिनरीने सर्व रिंगण सोहळा मैदान सुसज्ज केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

4 Comments

Leave a Reply

Back to top button