Uncategorized

माढा लोकसभेसाठी कर्तृत्ववान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरच फिक्स – भाजपचे सोलापूर जिल्हा सह प्रभारी के. के. पाटील.

भारतीय जनता पार्टीमध्ये नव्याने आलेल्या खुर्द भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांना भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते के के पाटील यांनी चपराक दिली.

माळशिरस ( बारामती झटका )

माढा लोकसभेसाठी कर्तृत्ववान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरच फिक्स असे भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा सह प्रभारी व सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे विद्यमान सदस्य व पंचायत समितीचे तीन वेळा सदस्य असणारे के के पाटील यांनी फेसबुक वर शेअर केलेले आहे.
के के पाटील यांच्या फेसबुक पेजवर लोकसभेसाठी कर्तुत्ववान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर फिक्स असे लिहून भारतीय जनता पक्ष हा निष्ठावंतांचा पक्ष आहे राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षासारखी रचना भाजपात नाही दबावाखाली कोणालातरी उमेदवारी मिळेल अशी सिस्टीम भारतीय जनता पार्टीमध्ये नाही खासदार माननीय रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या चार वर्षाच्या काळात वर्षानुवर्षे कागदावर असलेले प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

लोकांची कामे तत्परतेने करण्यासाठी खासदार सदैव दक्ष असतात त्यांच्या या मेरिट वरच त्यांना पुन्हा खासदारकी मिळेल यात शंका नाही असे फेसबुक पेजवर लोड केलेले आहे.
भारतीय जनता पार्टीमध्ये नव्याने आलेल्या खुर्द भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांना भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते के के पाटील यांनी चपराक दिली असल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button