मामासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीत उज्ज्वल भविष्यासाठी करिअरला सुरुवात केली, त्या पांढरे इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक दुकानासमोर वाढदिवसाचा बॅनर झळकत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चहा विकला कोणी पिले नाही, उद्योजक धीरूभाई अंबानी यांनी डिझेल पेट्रोल विकताना कोणी टाकलेली नाही, मात्र जननायक मामासाहेब पांढरे यांनी सीडी कॅसेट विकताना अनेकांनी खरेदी केली आहे.
नातेपुते ( बारामती झटका )
मामासाहेब पांढरे यांनी घरच्या आर्थिक अडचणींमुळे शाळा सोडल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत उज्ज्वल भविष्यासाठी करिअरला सुरुवात केली. त्या पांढरे इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक दुकानासमोर वाढदिवसाचा बॅनर झळकत आहे.
पांढरे इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक दहीगाव रोडवरील दुकानात सिडी कॅसेट विक्रीस सुरवात केलेली होती. प्रतिकुल उपस्थितीत राजाभाऊ पांढरे यांचे मोलाचे सहकार्य मिळालेले होते. पूर्वीच्या काळी चित्रपट गृहात जाऊन पिक्चर पाहणे सर्वसामान्य लोकांना परवडत नव्हते. त्यावेळेस पिक्चर व गाण्याची सिडी कॅसेट विक्रीतून चांगला नफा मिळत होता. कॅसेट दुकानांमधूनच मामांच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी उद्योग व्यवसायातील पहिलं पाऊल ठरले आहे. मामांच्या जीवनाची खडतर वाट होती. अशा बिकट परिस्थितीत मामांनी आकाशाला गवसणी घातलेली आहे. तरी सुद्धा राजाभाऊ आणि मामासाहेब यांचे अतुट नाते जसेच्या तसे आहे. मामासाहेब पांढरे यांचे नातेपुते पंचक्रोशीमध्ये अनेक मोठमोठे बॅनर लावलेले आहेत. अनेकांचे मामांसमवेत संबंध परिस्थिती बदलल्यानंतर आलेले आहेत. मात्र, प्रतिकूल परिस्थितीत ज्यांनी साथ दिली अशा पांढरे इलेक्ट्रिकल्स व इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोरील बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकलेला आहे. उद्योजक धीरूभाई अंबानी यांनी डिझेल, पेट्रोल पंपावर विकताना कोणी वाहनांमध्ये टाकलेले नाही. मात्र जननायक मामासाहेब पांढरे यांनी दुकानात सिडी कॅसेट विकताना नातेपुते पंचक्रोशीतील अनेकांनी खरेदी केलेले आहे.
शून्यातून विश्व निर्माण करणारे मामासाहेब झिरोतून हिरो झालेले आहेत. नातेपुते पंचक्रोशीतील 30 ते 35 खेडोपाड्यामध्ये राजकारणी, समाजकारणी, उद्योग व्यवसायातील उद्योजक, सर्वसामान्य जनता युवक व शेतकरी बांधव यांच्या मनामध्ये मामासाहेब पांढरे यांनी स्वतःची जागा निर्माण करून नातेपुते पंचक्रोशीत जननायक बनलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng