जननायक मामासाहेब पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त कारूंडे गावचे युवा उद्योजक अजीतशेठ जगताप यांनी सन्मान केला
नातेपुते ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील नातेपुते गावचे थोर सुपुत्र अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे सभापती जननायक, युवकांचे आशास्थान युवा नेते बापूराव उर्फ मामासाहेब पांढरे यांना वाढदिवसाच्या कारूंडे गावचे युवा उद्योजक अजीतशेठ जगताप यांनी संपर्क कार्यालयात येऊन शुभेच्छा दिल्या.
जननायक मामासाहेब पांढरे यांनी प्रतिकूल परिस्थिती जिद्द, चिकाटी व मेहनतीवर स्वतःचे कार्यकर्तृत्व उभा करून समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. नातेपुते पंचक्रोशीमध्ये सर्व समावेशक असणारं युवा नेतृत्व मामासाहेब यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे. कारूंडे गावचे युवा उद्योजक यांनीही आपल्या उद्योग व्यवसायामध्ये प्रगती करून समाजामध्ये आपला वेगळा ठसा उमटविलेला आहे.

कारूंडेसारख्या खेडेगावातून येऊन नातेपुते परिसरात अजित हायड्रोलिक उद्योग उभा केलेला आहे. मोठ्या मशीनचे बुम बनवण्याचे ग्रामीण भागात पहिल्यांदा नव्याने उद्योग अजितशेठ जगताप यांनी उभारलेला आहे.
उद्योग व्यवसायामध्ये नावाजलेले अजित शेठ यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त जननायक मामासाहेब पांढरे यांचा सन्मान मित्र परिवारासमवेत केलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
