Uncategorizedताज्या बातम्या

माळशिरस नगरपंचायतीचे महिला कबड्डी स्पर्धेमध्ये घवघवीत यश

माळशिरस (बारामती झटका)

महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद व महाबळेश्वर नगरपरिषद कर्मचारी वेल्फेअर क्लब यांच्या वतीने दि. १०/०२/२०२३ ते दि. १३/०२/२०२३ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी व क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये माळशिरस नगरपंचायतीने महिला कबड्डी, पुरुष क्रिकेट व पुरुष कबड्डी या खेळांच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये माळशिरस नगरपंचायतीने महिला कबड्डीमध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे. याचे स्वरूप कबड्डी चषक व सात हजार रुपये रोख रक्कम असे आहे.

माळशिरस नगरपंचायतीच्या या घवघवीत यशाचा सोहळा माळशिरस नगरपंचायतमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी नगरपंचायत चे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख व सर्व पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायतीच्या कबड्डी व क्रिकेट खेळाडूंचा सन्मान व सत्कार केला. तसेच त्यांच्या यशाचे कौतुक केले व भविष्यात होणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून पारितोषिके मिळवावीत यासाठी सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून जवळपास ६० नगरपालिकांनी आपला सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये क्रिकेटच्या ५८ संघांमध्ये स्पर्धा झाली व कबड्डीच्या ५२ संघांमध्ये स्पर्धा झाली.

या स्पर्धेसाठी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख व नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी नितीन गाढवे यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच टीमला प्रोत्साहन दिले. महिला क्रिकेट संघामध्ये कर्णधार श्रीमती भाग्यश्री रघुनाथ बेडगे, श्रीमती सुवर्ण हाके, श्रीमती भाग्यश्री कुलकर्णी, श्रीमती अस्मिता जाधव, श्रीमती रत्नमाला सिदवाडकर, श्रीमती सोनाली मदने, श्रीमती राखी बिडकर, श्रीमती नाजनीन शेख, श्रीमती सारिका वाघमोडे या महिला खेळाडूंनी ही स्पर्धा जिंकून माळशिरस नगरपंचायतसाठी राज्यस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेत पारितोषिक मिळवले. या स्पर्धामुळे माळशिरस नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी यांना रोजच्या कामाच्या व्यापातून मोकळीक मिळाली व ताजेतवाने वाटले.

तसेच पुढील कामासाठी ऊर्जा मिळाली आणि नगर परिषदेचे कामकाज व सांघिक वृत्तीचे दर्शन घडले. या कार्यक्रमावेळी माळशिरस नगरपंचायतीचे पदाधिकारी शिवाजी देशमुख, वैजिनाथ वळकुंदे, आबा धाईंजे, रघुनाथ चव्हाण, रणजीत ओहोळ, गौरव गांधी, प्रवीण केमकर, बबन शिंदे व माळशिरस नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button