Uncategorizedताज्या बातम्या

माळशिरस पंचायत समितीच्या वतीने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर विविध सुविधांचे आयोजन

तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग सज्ज

माळशिरस (बारामती झटका)

आषाढी यात्रा पालखी सोहळा सुरू आहे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्यासह अनेक पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ आहेत. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे आगमन माळशिरस तालुक्यात झाले आहे. पालखीमध्ये असणाऱ्या पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य विभाग पंचायत समिती, माळशिरस यांच्यावतीने विविध सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.

यामध्ये आरोग्य सल्ला व उपचार केंद्र, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका, रुग्णवाहिका 108, वैद्यकीय अधिकारी, खाजगी दवाखाने, हॉटेल, पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण केलेले स्त्रोत, टँकर भरण्याची ठिकाणे, रक्तपेढी, जैविक कचरा स्वीकृती केंद्र, माता स्तनपान केंद्र, कोविड -19 विलगीकरण कक्ष, कोविड -19 लसीकरण व टेस्टिंग केंद्र तसेच महिला डॉक्टर देखील उपलब्ध असणार आहेत.

त्याचबरोबर आरोग्य सुविधासाठी महत्त्वाचे असणारे संपर्क क्रमांक देखील दिले आहेत यामध्ये रुग्णवाहिका संपर्क १०८, रक्तपेढी (०२१८५) २२२१०१, उपजिल्हा रुग्णालय अकलूज (०२१८५) २२२१४२, २२२७८९, ग्रामीण रुग्णालय नातेपुते (०२१८५) २६२३०५, ग्रामीण रुग्णालय माळशिरस (०२१८५) २३५०९३, आरोग्य विभाग माळशिरस ९९२२१९०००४, ९७३०७१०६७६, ८७९३१२३९८४, प्रा. आ. केंद्र मोरोची ९५६१८६६७९०, प्रा. आ. केंद्र पुरंदावडे ९४२००९४६७८, प्रा. आ. केंद्र वेळापूर (०२१८५) २४५०५५, डॉ. अभयकुमार मेहता (प्रा. आ. केंद्र मोरोची) ९५५२२४८३३३, डॉ‌‌. सुचित्रा सावंत (प्रा. आ. केंद्र मांडवे) ७४४७६८७८१३, डॉ. सोनाली परतवार (प्रा. आ. केंद्र पुरंदावडे) ९४०४६२९९९०, डॉ. अमोल आव्हाड (प्रा. आ. केंद्र शंकरनगर) ९८२२१७७०१२, डॉ. बापू ओव्हाळ (प्रा. आ. केंद्र वेळापूर) ९८५०३५५८५४, डॉ. रामचंद्र मोहिते, माळशिरस तालुका आरोग्य अधिकारी ९८२२६७०३९८, ८६६८३८७८८९.

या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन माळशिरस तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र मोहिते यांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button