माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी बालविवाह थांबवून केली कारवाई
आत्ता पर्यंत ६ बालविवाह रोखून माळशिरस पोलीस स्टेशनने केली धडाकेबाज कामगिरी
माळशिरस (बारामती झटका)
सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी सुरू केलेल्या बालविवाह प्रतिबंधक मोहिमे अंतर्गत अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीणचे हिम्मतराव जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस पोलीस ठाणे हद्दीत बालविवाह प्रतिबंधक कारवाई मोहीम सुरू केली आहे.
या कारवाईमध्ये आत्तापर्यंत एकूण ६ बालविवाह थांबविण्यात यश आले आहे. तसेच बालविवाह करण्यात येणाऱ्या बालिकांना जिल्हा महिला व बाल संरक्षण समिती सोलापूर यांच्या समक्ष हजर केले आहे. पोलीस ठाणे हद्दीत बालविवाह होणार नाहीत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून बालविवाह थांबविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

तसेच समाजामध्ये बालविवाहामुळे मुलींवर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात येत असल्यामुळे नागरिकांकडून बालविवाहबाबत माहिती प्राप्त होत आहे. येणाऱ्या काळात माळशिरस पोलीस ठाणे हद्दीत एकही बालविवाह होणार नाही, यासाठी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावांमधील नागरिकांच्या मदतीने व सहकार्याने प्रयत्न केले जाणार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
