माळशिरस येथे ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली ऑनलाइन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
माळशिरस (बारामती झटका)
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शासनमान्य ग्रंथालयासाठी अनुदान व व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब केला आहे. प्रणालीमुळे शासनमान्य ग्रंथालयाच्या निधी वितरणात सुसुत्रता येणार असल्याचे जिल्हा ग्रंथालयाचे निरीक्षक प्रदीप गाडे यांनी माळशिरस गोपाळराव देव प्रशाला, माळशिरस येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.
माळशिरस तालुक्यातील ग्रंथालयाचे पदाधिकाऱ्यांच्या अनुदान व्यवस्थापन प्रणाली ऑनलाइन प्रशिक्षण आयोजन केले होते. सदर ऑनलाईन प्रशिक्षणासाठी तालुक्यातील शासनमान्य ग्रंथालयातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापुढील काळात शासनमान्य ग्रंथालयांना वार्षिक अहवाल हा ऑनलाइन पद्धतीनेच भरावा लागणार असून त्यामुळे तो अहवाल कशाप्रकारे दिलेल्या वेबसाईटवर भरावयाचा आहे, याचे प्रशिक्षण तालुक्यातील ग्रंथालयाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. ऑनलाइन प्रणालीमुळे अनुदानप्राप्त वाचनालयांना एकाच वेळी अनुदान सोडणे शासनास सोयीस्कर ठरेल.
प्रशिक्षणाच्या सुरुवातीस ग्रंथालय शास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे जिल्हा निरीक्षक प्रदीप गाडे साहेब, जिल्हा संघाचे अध्यक्ष विजय पवार सर, हनुमान वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. देशपांडे मॅडम यांच्या हस्ते करून सदर प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली. श्री. प्रदीप गाडे यांनी दिलेले प्रशिक्षण याचा पुरेपूर उपयोग करून भविष्यकाळात सर्व प्रकारच्या सूचनांचे पालन करू, असे उपस्थित प्रशिक्षणार्थी यांनी सांगितले.
सदरची कार्यशाळा संपन्न करण्यासाठी हनुमान वाचनलय माळशिरस व गोपाळराव देव प्रशाला माळशिरस यांनी प्रयत्न केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng