ताज्या बातम्या

श्रीमती अनुसया गेना रुपनवर पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन…

लोणंद गावचे माजी सरपंच दगडू गेना रुपनवर पाटील यांना मातृशोक तर राजू रुपनवर पाटील यांच्या आजी होत्या.

लोणंद (बारामती झटका)

लोणंद ता. माळशिरस, येथील श्रीमती अनुसया गेना रुपनवर पाटील यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने गुरुवार दि. २७ जुलै २०२३ रोजी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात दगडू, हनुमंत व दत्तात्रय अशी तीन मुले व बायडाबाई महादेव शेंडगे एक मुलगी असा परिवार आहे.

लोणंद गावचे माजी सरपंच दगडू गेना रुपनवर पाटील यांच्या मातोश्री होत्या तर लोणंद गावचे युवानेते राजू रुपनवर पाटील यांच्या त्या आजी होत्या‌. त्यांच्यावर लोणंद गावाशेजारील संगमेश्वर मंदिराजवळ राहत्या निवासस्थानाशेजारील शेतामध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लोणंद पंचक्रोशीतील ग्रामस्थ, मित्रपरिवार व नातेवाईक तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व. अनुसया रुपनवर पाटील यांचा तिसऱ्याचा रक्षा विसर्जन कार्यक्रम शनिवार दि. २९ जुलै २०२३ रोजी सकाळी ७ वा. होणार आहे.

स्वर्गीय श्रीमती अनुसया रुपनवर पाटील यांच्या मृतात्म्यास शांती लाभो व रुपनवर पाटील परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort