मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरपंचायतच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांची मागणी.
विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील व विधानसभेचे आमदार राम सातपुते यांनाही सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यासाठी आग्रही
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे माळशिरस नगरपंचायत येथील सफाई कर्मचारी यांच्या पदांच्या आकृतीबंधाचा शासन निर्णय काढण्यासाठी माळशिरस नगरपंचायतीचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी सदिच्छा भेट घेऊन निवेदनाच्या प्रति दिलेल्या आहेत. सदर निवेदनाच्या प्रती विधान परिषदेचे युवा आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्याकडे निवेदन देऊन सभागृहांमध्ये तारांकित प्रश्न करून महाराष्ट्रातील तमाम सफाई कामगारांचा प्रश्न मिटवावा, असे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी सफाई कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी दिलेल्या निवेदनामध्ये माळशिरस येथील नगरपंचायत येथील उद्घोषणापूर्वी कायम आठ सफाई कर्मचारी यांचे पदाच्या आकृतीबंधाचा शासन निर्णय काढण्याची विनंती केलेली आहे. माळशिरस नगरपंचायतीचे नव्याने नगरपंचायतीमध्ये शासन निर्णयान्वये दि. 15 सप्टेंबर 2015 रोजी रूपांतर झाले आहे. नवनिर्मित नगरपंचायतीच्या इतर पदावर कार्यरत कर्मचारी सफाई कर्मचारी वगळतात. यांचे करिता शासनाने नवनिर्मित नगरपरिषद, नगरपंचायतमधील ग्रामपंचायतकालीन कर्मचारी यांचेकरिता शासन निर्णय क्रमांक एमसीओ 2015 प्र. क्र. 139 नवि – 14 दि. 5 जुलै 2016 अन्वये कर्मचारी यांचे पदांचा आकृतीबंध तयार करण्यात आलेला आहे. परंतु त्याच शासन निर्णयामध्ये सफाई कामगार यांचे करिता 1000 लोकसंख्येमागे एक सफाई कामगार असे काल्पनिक 1366 पदे निर्माण करण्यात आले असून त्यानुसार सहाय्यक वेतन अनुदान शासनाने मंजूर केलेले आहे. परंतु प्रत्यक्षात नवीन आकृतीबंध लागू करत असताना या आकृतीबंधामध्ये सफाई कर्मचारी यांची पदे मंजूर केलेली नसल्याबाबतचा अर्ज नगरपंचायतीच्या सफाई कर्मचारी यांनी माझ्याकडे सादर केलेला आहे. त्या अर्जाची छायांकित प्रत व वर नमूद रोजीचा शासन निर्णयाची प्रत आपल्या माहितीसाठी सोबत जोडत आहे.
तरी सफाई कर्मचारी यांचे अर्जाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतकालीन आस्थापनेवर कायम सफाई कर्मचारी असलेल्या नगरपंचायत उद्घोषने पूर्वीच्या सफाई कर्मचारी यांचे पदाचा आकृतीबंध तयार करणे करता विषय आपले स्तरावरून राज्य मंत्रिमंडळ अथवा अधिवेशनामध्ये प्रस्तावित करून माळशिरस नगरपंचायतीच्या कायम 8 सफाई कर्मचारी यांचे पदाचा आकृतीबंध तयार करणे बाबत शासनाकडे पाठपुरावा करून सफाई कामगार यांना न्याय मिळवून द्यावा, अशा पद्धतीचे माळशिरस नगरपंचायतीचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब एकनाथ देशमुख यांनी निवेदन देऊन सदरचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून सफाई कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही राहिलेले आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.