मोटेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील मोटेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन रविवार दि. ९/१०/२०२२ ते शनिवार दि. १५/१०/२०२२ अखेर संतोबा बिरोबा ज्योतिबा मंदिर दडसवस्ती येथे करण्यात आले आहे. सदर व्यासपीठाचे चालक ह.भ.प. बापू महाराज देशमुख फोंडशिरस, मोटेवाडी आहेत तर मार्गदर्शक ह.भ.प. मधुकर धनवे महाराज वडवळ हे मार्गदर्शक आहेत.
या सप्ताहामध्ये रविवार दि. ९/२०/२०३३ रोजी प्रवचनकार ह.भ.प. अभय महाराज वीर यांचे कीर्तन होणार असून या दिवशी नाष्टा माणिक महादेव दडस, दुपारी कोंडीबा शिवराम वाघमोडे आणि संध्याकाळी पोपट सर्जेराव भाळे यांच्यावतीने अन्नदान करण्यात येणार आहे. सोमवार दि. १०/१०/२०२२ रोजी प्रवचनकार ह.भ.प. मयूर महाराज पवार युवा कीर्तनकार अंबाजोगाई यांचे कीर्तन गोरक्ष नगर चौगुले वस्ती येथे होणार असून या दिवशी नाष्टा रणजीत वलेकर वटपळी, दुपारी मामा महादेव हुलके आणि संध्याकाळी पांडुरंग नारायण हुलगे यांच्यावतीने अन्नदान करण्यात येणार आहे.
मंगळवार दि. ११/१०/२०२२ रोजी प्रवचनकार ह.भ.प. पांडुरंग शेळके गार अकोले यांचे कीर्तन ६१ फाटा सिदाचीवाडी येथे होणार असून या दिवशी सकाळी नाष्टा बबन जाध,व दुपारी बापूराव मारुती पालवे आणि संध्याकाळी उत्तम पंढरी दडस यांच्यावतीने अन्नदान करण्यात येणार आहे. बुधवार दि.१२/१०/२०२२ रोजी प्रवचनकार ह.भ.प. जगताप महाराज अकोले यांचे कीर्तन डोंबाळवाडी येथे होणार असून या दिवशी नाष्टा विष्णू पंढरी दडस, दुपारी माणिक दगडू देवकाते आणि संध्याकाळी दत्तू महादेव वायदंडे यांच्यावतीने अन्नदान करण्यात येणार आहे.
गुरुवार दि. १३/१०/२०२२ रोजी प्रवचनकार ह.भ.प. शोभाताई वैजिनाथ परळी यांचे कीर्तन घुलेवस्ती येथे होणार असून नाष्टा बाळू केरबा हुलगे, दुपारी हनुमंत जगन्नाथ मोटे आणि संध्याकाळी राजू नारायण मेटकरी यांच्यावतीने अन्नदान करण्यात येणार आहे. शुक्रवार दि. १४/१०/२०२२ रोजी ह.भ.प. मधुकर महाराज धनवे, वडवळ यांचे कीर्तन सावतामाळी मस्केमळा येथे होणार असून या दिवशी नाष्टा शिवाजी भानुदास रुपनवर, दुपारी सोपान राघू दडस आणि संध्याकाळी मधुकर बाबा दडस यांच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे. शनिवार दि. १५/१०/२०२२ रोजी प्रवचनकार ह.भ.प. देशमुख महाराज उत्तरेश्वर पिंपरी यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तर काल्याचा महाप्रसाद माणिक महादेव दडस यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
तरी या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.