Uncategorizedताज्या बातम्या

बांधकाम विभागाने कारवाईचे खोटे पत्र दिल्याच्या निषेधार्थ ‘जनशक्ती’ चे बांगडी आंदोलन

जनशक्ती संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष वनिता बर्फे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांचा सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज कार्यालयावर बांगडी मोर्चा

अकलूज ( बारामती झटका)

कोर्टी ते आवटी रस्ता मुदतीत पूर्ण न केल्यामुळे आरएसआयआयएल एनपी इन्फ्रा प्रा. लि. कन्स्ट्रक्शन कंपनीला लाखो रुपयांचा दंड आकारल्याचे खोटे पत्र देऊन जनशक्ती संघटनेची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ तसेच सांभवी कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांच्यावरती कारवाई करावी, या मागणीसाठी शेकडो महिला घेऊन दि. 30/09/22 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, अकलूज यांच्या कार्यालयासमोर बांगडी घेऊन आंदोलन करणार असल्याचे निवेदन जनशक्ती संघटनेने दिले आहे.

या निवेदनात पुढे लिहिले आहे की, दौंड-करमाळा-परंडा-बार्शी ते उस्मानाबाद राज्य महामार्ग 68 या रस्त्याची दुरुस्ती व सुधारणा करणे बाबतच्या कामात निविदा शर्तीनुसार विहित मुदतीमधील काम अपूर्ण होते. याबाबत जनशक्ती संघटनेने आंदोलन केल्यानंतर दि.18/02/2022 रोजी
उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, करमाळा यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकलूज निरंजन तेलंग यांच्या सांगण्यानुसार सदर कन्स्ट्रक्शन कंपनीला प्रतिदिन ८.५० लाख रु. इतक्या दराने दंडाची आकारणी चालू असल्याचे पत्र जनशक्ती संघटनेला दिले होते. परंतु, सदर कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाने आकारलेल्या कोणत्याही दंडाची वसुली केलेली नाही. जनशक्ती संघटनेची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी फसवणूक केली आहे.

सदर कन्स्ट्रक्शन कंपनी व ठेकेदारांना कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग हे पाठीशी घालत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी.

कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांची पूर्व पार्श्वभूमी पाहता तेलंग हे पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे येथे कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात आर्थिक देवाणघेवाणीतून ठेकेदारांना निविदामधील अटी व शर्तींची पूर्तता न करता कामे दिलेले आहेत. तसेच बोगस बिले अदा करण्यात आलेले आहेत. याबाबत विविध संघटनांनी भ्रष्टाचाराबाबतच्या अनेक तक्रारी शासन दरबारी प्राप्त आहेत.

वादग्रस्त अधिकारी तेलंग यांची एफडीए प्रकरणात अकलूज येथे बदली झालेली असून निरंजन तेलंग यांनी अकलूज विभाग येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. यातून तेलंग यांनी मोठ्या प्रमाणात नामी-बेनामी संपत्ती जमवली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने जनशक्ती संघटनेची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे-पाटील यांच्या आदेशानुसार व महिला प्रदेशाध्यक्ष विनिता बर्फे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांना सोबत घेऊन मा. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अकलूज यांच्या कार्यालयासमोर दि. 30/09/2022 रोजी शुक्रवारी बेमुदत बांगडी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button