खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे करमाळा तालुक्यातील जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार व अभिनंदन…
करमाळा (बारामती झटका)
माढा लोकसभेचे कार्यतत्पर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काहीच दिवसापूर्वी केम रेल्वे स्टेशनच्या कार्यक्रमांमध्ये अहमदनगर वरून येणारा जो करमाळा टेंभुर्णी मार्गे जो रस्ता आहे, तो लवकरच मंजूर केला जाईल अशी घोषणा केली होती, ती आज प्रत्यक्षात साकार झालेली आहे. केंद्र सरकारने जे राजपत्र जाहीर केले आहे, त्यामध्ये या रस्त्यास मंजुरी देण्यात आलेली आहे, असं पत्र व परिपत्रक खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना सरकारच्या वतीने पाठवण्यात आले आहे.





त्यामुळे या भागातील अत्यंत महत्त्वाचा असणारा रस्ता मंजूर झालेला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये या भागातील व्यवसाय वाढीसाठी मदतच होणार आहे. त्यामुळे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे करमाळा तालुका जनतेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng