विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रगतीचे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे – प्रा. के. एल. पवळ

अकलूज (बारामती झटका)
शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या एम. एस्सी. ऍग्रोकेमिकल्स अँड पेस्ट मॅनेजमेंट या पदव्युत्तर विभागातर्फे बी. एस्सी. आणि एम. एस्सी. नंतर ‘विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. के. एल. पवळ क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, गव्हर्मेंट आयटीआय पंढरपूर हे उपस्थित होते.
आपल्या भाषणामध्ये त्यांनी “विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचा ध्यास घ्यावा. ती स्वप्नने सत्यात उतरविण्याचा प्रयत्नशील असले पाहिजे. असा मोलाचा सल्ला दिला. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या करिअरच्या संधी तसेच विविध स्पर्धा परीक्षांविषयी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी ८० विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. टिळेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवण्याचा सल्ला दिला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. डी. आर. कांबळे यांनी केले व आभार प्रा. रोहित कुंभार यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. एस. देवकर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. प्रमोद घोगरे, प्रा. सूर्या यादव, प्रा. नंदकुमार गायकवाड, प्रा. अस्मिता माने, प्रा. स्नेहल पांढरे यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमासाठी बी. एस्सी. भाग ३, एम. एस्सी. भाग १ व २ चे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एस्सी. भाग २ चा विद्यार्थी चंद्रशेखर बुट्टे यांने केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.