राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर जात वैधता प्रमाणपत्रावर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर संकल्प डोळस यांच्याकडून मोहिते पाटील यांचा डोळा आहे का ? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू…
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. माजी आमदार स्व. हनुमंत डोळस यांचे पुत्र संकल्प डोळस यांनी मुंबई उच्च न्यायलयात जानकर यांच्या वैध ठरलेल्या दाखल्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दि. 14 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. जात वैधता प्रमाणपत्रावर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे. संकल्प डोळस यांच्याकडून मोहिते पाटील यांचा खाटीक धनगर जातीच्या दाखल्यावर डोळा आहे की काय ? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका लक्षात घेता तातडीची सुनावणी घ्यावी, हा मुद्दा सुप्रीम कोर्टासमोर डोळस यांच्या वकिलांनी ठेवला असता दि. 14 नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी ठेवली होती. या दिवशी आपले म्हणणे मांडण्यासाठी उत्तमराव जानकर यांच्या वकिलांनी वेळ मागून घेतला. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलली गेली आहे. मार्च 2022 मध्ये अपील दाखल झाल्यापासून जानकर यांच्याकडून उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागण्याची ही दुसरी वेळ आहे.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लक्षात घेता सुप्रीम कोर्टातील घडामोडींमुळे माळशिरस तालुक्यातील राजकीय वातावरण अस्थिर व अनिश्चित बनले आहे. फेब्रुवारी नंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक होणार आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
