लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी लोणंद येथील ग्रामदैवत श्रीनाथ बोधोबा मंदिरास सभामंडपासाठी २० लाख रुपये मंजूर केले.

श्रीनाथ बोधोबा यात्रेतील कुस्त्यांच्या वेळी आमदार नसताना मनातील इच्छा आमदार झाल्यानंतर राम सातपुते यांनी पूर्ण केली आहे.
लोणंद (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांनी 25 15 योजनेतून लोणंद गावचे ग्रामदैवत श्रीनाथ बोधोबा मंदिरास सभा मंडपासाठी 20 लाख रुपये मंजूर केलेले आहे. श्रीनाथ बोधोबा भक्त व ग्रामस्थ यांच्यामधून समाधान व्यक्त केले जातात आहे.
श्रीनाथ बोधोबा यात्रेमध्ये भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले जाते. सदरच्या कुस्ती मैदानास राम सातपुते यांनी उपस्थित राहून श्रीनाथ बोधोबा देवाचा निसर्गरम्य परिसर व भाविकांची श्रद्धा पाहिलेली होती. मनामध्ये इच्छा व्यक्त केली होती, आपण जर भविष्यात आमदार झालो तर या ग्रामदैवत श्रीनाथ बोधोबा मंदिरासाठी सभामंडप देण्याची मनोमन इच्छा व्यक्त केलेली होती. योगायोगाने माळशिरस तालुक्यातील जनतेने व देवतांच्या आशीर्वादाने लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची संधी मिळालेली आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघातील अनेक ठिकाणी सभा मंडप व समाज मंदिरे यासाठी निधी उपलब्ध केलेला आहे. श्रीनाथ बोधोबा देवाच्या सभा मंडपास 2515 योजनेतून 20 लाख रुपये मंजूर केलेले आहे. लोणंद ग्रामस्थ व बोधोबा भक्तांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. समाजामध्ये अनेक नेते जाहीर बोललेले आहेत, पण, आश्वासने पूर्ण करू शकत नाहीत. मात्र मनामध्ये संकल्प केलेले लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी श्रीनाथ बोधोबा भक्तांची राहण्याची व विधी करण्याची अडचण दूर केलेली आहे. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या दमदार कामगिरीबद्दल लोणंद ग्रामस्थ व बोधोबा भक्तांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng