ताज्या बातम्यासामाजिक

मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या नियोजनात सदाशिवनगर नगरी भाविकांसाठी सज्ज..

सदाशिवनगर ग्रामपंचायतीला पालखी नियोजन नोडल अधिकारी श्री. जयवंतराव टकले यांची सदिच्छा भेट…

सदाशिवनगर (बारामती झटका)

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक पालख्यांचे पायीवारी माळशिरस तालुक्यात आगमन होत असते. येणाऱ्या भाविकांची व वारकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी पालखी महामार्गावरील ग्रामपंचायती विविध सुखसुविधा पुरवत असतात. सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या नियोजनात सदाशिवनगर नगरी भाविकांसाठी सज्ज झालेली आहे.

सदाशिवनगर ग्रामपंचायतीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी नियोजन नोडल अधिकारी तथा सांगोला पंचायत समितीचे महिला व बालकल्याणचे विस्तार अधिकारी श्री. जयवंतराव टकले यांनी सदिच्छा भेट देऊन पालखी नियोजन आढावा घेतलेला आहे.

माळशिरस तालुक्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन दि. 11/07/2024 रोजी होत असते. पहिला मुक्काम नातेपुते येथे झाल्यानंतर दुसऱ्या मुक्कामाकरिता माळशिरस येथे पालखी जात असते. या वेळेला सदाशिवनगर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी व वर्दळ असते.

सदाशिवनगर ग्रामपंचायत यांनी पालखी मार्गाची स्वच्छता केलेली असून दिवाबत्तीची सोय केलेली आहे. मुख्य रस्ता व आजूबाजूंच्या रस्त्याची झाडे झुडपे काढून कचऱ्याचे व्यवस्थापन करून नवीन वृक्ष लागवडीसाठी खड्डे तयार केलेले आहेत. आरोग्य सुविधा, हिरकणी कक्ष उभारलेला आहे. वाहतुकीची सुविधा केलेली आहे. गावातील रस्ते गटार स्वच्छ केलेले आहेत. वारकऱ्यांना राहण्याकरता शाळा खोल्या व इतर निवार्याच्या ठिकाणी स्वच्छता करून सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. वारकऱ्यांना पायी चालून कंटाळा आलेला असतो. अशावेळी मसाज केंद्र उभारण्यात आलेले आहे. पायी चालत असताना चप्पल तुटल्यानंतर दुरुस्तीची ही सुविधा उपलब्ध केलेली आहे. पावसाळा सुरू असल्याने छत्रीची दुरुस्ती सुरू केलेल्या गावांमध्ये डासाचं व इतर कीटकांचे प्रभाव होऊ नये म्हणून धूर फवारणी व गटारी जवळ पावडर टाकलेले आहे. शुद्ध पाणी भाविकांना मिळावे यासाठी पाण्याचे शुद्धीकरण, प्लास्टिकचा कचरा होऊ नये यासाठी प्लास्टिक संकलन केंद्र उभा केलेले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी आशा अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी अहोरात्र प्रयत्न करून सदाशिवनगर नगरी भाविकांसाठी सज्ज झालेली आहे.

सदरच्या पालखी नियोजन ग्रामविकास अधिकारी श्री. प्रशांत रुपनवर यांनी स्वतः सर्व गोष्टींचे बारीक नियोजन केलेले आहे. नोडल अधिकारी तथा महिला व बालकल्याणचे विस्तार अधिकारी श्री. जयंतराव टकले यांनी पालखी नियोजन आढावा घेतलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
15:29