अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप कोहिनकर यांच्या शुभहस्ते माऊलींच्या मांडवे विसावा ठिकाणी वृक्षारोपण…..

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यातील मांडवे गावच्या ओढ्यावरील विसावा तयारीची अंतिम टप्प्याकडे वाटचाल..
मांडवे (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप कोहिनकर यांच्या शुभ हस्ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारीतील पायी वारी पालखी सोहळ्यातील मांडवे, ता. माळशिरस गावच्या ओढ्यावरील विसावा या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, मांडवे गावचे कर्तव्यदक्ष सरपंच श्री. रितेश पालवे पाटील, उपसरपंच श्री. सुरज साळुंखे पाटील, विस्तार अधिकारी श्री. लोंढे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. रवींद्र पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक संतांच्या पालख्या पायी चालत येत असतात. अशावेळी येणाऱ्या भाविकांची अडचण होऊ नये यासाठी जिल्हा परिषद व नगरपंचायतीच्या माध्यमातून भाविकांना सुख सुविधा उपलब्ध केल्या जातात. अडीअडचणी दूर केल्या जातात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या विस्तारीकरणामध्ये अनेक जुन्या वृक्षांची तोड झालेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती यांनी वृक्षारोपण अभिनव उपक्रम हाती घेतलेला आहे. पालखी विसावा व मुक्कामाच्या ठिकाणी वृक्षारोपण केले जात आहे.

नातेपुते येथून पालखी मुक्काम संपल्यानंतर पहिला न्याहारीचा विसावा मांडवे येथे असतो. या ठिकाणी पंचक्रोशीतील भाविक भक्त माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात. विसावा ठिकाणी ग्रामपंचायत रस्त्यांची डागडुजी, खड्ड्यांमध्ये मुरूम भरून काटेरी झुडपे काढली जात आहेत. सध्या मांडवे गावच्या ओढ्यावरील विसावा ठिकाण तयारीची अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे. सरपंच रितेश पालवे पाटील व उपसरपंच सुरज साळुंखे पाटील स्वतः लहानसहान गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत. येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी विसावा ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.