लवंगच्या फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या बाळगोपाळांनी आंतरराष्ट्रीय योगादिनाचा मनमुराद आनंद लुटला.
संग्रामनगर (बारामती झटका) केदार लोहकरे यांजकडून
माळशिरस तालुक्यातील लवंग येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्या मुलांनी विविध योगासने करत आंतरराष्ट्रीय योगदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. या मुलांना शाळेत सोडायला आलेल्या पालकवर्गांनीही मुलांबरोबर योगासने करून आपला सहभाग नोंदवीला. या स्कूलच्या प्राचार्या नूरजहाँ शेख यांनी स्वतः योगासनाची प्रात्यक्षिक करून लहान मुलांकडून योगासने करून घेतले.
२१ जून या दिवशी सर्व जगभर योगदिन साजरा केला जात असताना ग्रामीण भागातील व खेड्यातील शाळेच्या मुलांनी व लोकांनी योगासने करत योगदिवस साजरा केला. यावेळी योगसनाचे महत्व सांगताना शाळेच्या संचालिका नूरजहाँ फकृद्द्दीन शेख म्हणाल्या की, योगासनांचे महत्व प्रत्येकाने समजले पाहिजे. शरीर फिट, निरोगी राहण्यासाठी, अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी रोजच्या रोज योगा करणे अत्यंत आवश्यक आहे. योगा केल्याने डायबेटीज, बी.पी. अशा महाभयंकर आजारांना आपण नियंत्रीत ठेवू शकतो. तसेच नियमित प्राणायाम केल्याने फुफुसाची क्रिया उत्तमरित्या चालते. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. रक्ताभिसरण क्रिया जलद होते, यामुळे ऍलर्जी, श्वसानाचे आजार आपण धुडकावून लावू शकतो. ताडासन केल्याने संम्पुर्ण शरीराच्या स्नायूंना ताण पडल्याने लावचिकता अंगी येते. लहान मुलाची उंची वाढवण्यासाठी ताडासन अत्यंत गुणकारी, परिणामकारी ठरते. धनुरासन केल्याने पाठींच्या मनक्यांना आराम मिळतो. मनक्याची होणारी झीज आटोक्यात येते. पाटदुखीपासून आराम मिळतो. शरीरात उत्साह निर्माण होतो. परिणामी मानसिक उत्साह वाढतो. ताणतनावापासून माणूस मुक्त होतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगासने नियमित करणे अत्यंत गरजेचे व महत्वाचे आहे.
याप्रसंगी शिक्षिका गुलशन शेख तसेच सचिन जाधव, असलम काझी, शितल भुजबळ, रणजित चव्हाण, महादेव कोळेकर, निलेश वाघ, भिलारे यांच्यासह अनेक पालकांनी योासनाचे महत्व जाणून घेऊन विद्यार्थ्यांसमवेत योगासने केली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Excellent content! The clarity and depth of your explanation are commendable. For a deeper dive, check out this resource: EXPLORE FURTHER. What do you all think?