Uncategorized

फोंडशिरस येथील सिताराम आप्पा रणदिवे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन….

फोंडशिरस (बारामती झटका)

फोंडशिरस ता. माळशिरस येथील सिताराम आप्पा रणदिवे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 78 व्या वर्षी गुरुवार दि. 22 जून 2023 रोजी दुपारी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे‌ त्यांच्यावर अंतिम संस्कार फोंडशिरस येथील दडस वस्ती नजीक राहत्या निवासस्थानाशेजारील शेतामध्ये शोकाकुल वातावरणात करण्यात आलेले आहेत. यावेळी फोंडशिरस पंचक्रोशीतील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वर्गीय सिताराम रणदिवे यांचा जन्म 01/01/1945 साली झालेला होता. त्यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती. सुसंस्कृत स्वभाव असल्याने समाजामध्ये मानाचे स्थान होते. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांवर चांगले संस्कार केलेले आहेत. एक मुलगा गोवा राज्यात स्वतःचा उद्योग व्यवसाय करीत आहेत.

त्यांच्या रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम शुक्रवार दि. 23 जून 2023 रोजी दुसऱ्या दिवशी घेण्यात येत आहे‌. कारण, तिसऱ्या दिवशी शनिवार येत असल्याने रणदिवे परिवारांनी उद्याच तिसरा करण्याचा ठरविलेले आहे. स्वर्गीय सिताराम रणदिवे यांच्या दुःखद निधनाने रणदिवे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. रणदिवे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व मृतात्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली…

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort