ताज्या बातम्याराजकारण

लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे तामशिदवाडी शेंडेवाडी खुळेवाडी सरपंच व ग्रामस्थांनी आभार मानले.


भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी तामशिदवाडी खुळेवाडी शेंडेवाडी संयुक्त ग्रामपंचायत प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडलेली आहे.

सदाशिवनगर (बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी तामशीदवाडी शेंडेवाडी खुळेवाडी संयुक्त ग्रामपंचायत प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडलेली असल्याने विद्यमान लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच सौ. मनीषा डुबल, उपसरपंच सौ. ऐश्वर्या नरूटे, ग्रामसेवक रमेश जमदाडे व ग्रामपंचायत सदस्य व समस्त ग्रामस्थ यांनी विशेष आभार लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे मानलेले आहेत.

तामशिदवाडी शेंडेवाडी खुळेवाडी या ग्रामपंचायतीमधील विविध रस्ते व ओढ्यावरील पूल यासाठी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यातून तामशिदवाडी ते ढोबळेवस्ती या रस्त्याला 80 लाख रु. तर तामशिदवाडी ते आद्रटवस्ती या रस्त्यासाठी 60 लाख रु. तर सदाशिवनगर फोंडशिरस बागर्डे रस्त्यावरील तामशिदवाडी नादवी ओढ्यावरील मोठा नवीन पूल बांधणे यासाठी 5 कोटी 30 लक्ष रु. असा 5 ते 6 कोटी रु. चा दणदणीत विकासनिधी माळशिरस तालुक्याचे विधानसभा सदस्य तथा लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते (भाऊ) यांच्या अविरत पाठपुराव्यामुळे नुकताच मंजुर झाला असून निविदा प्रक्रिया संपताच लवकरच ही कामे युद्धपातळीवर सुरू होतील. या भरीव निधीमुळे तामशिदवाडीचा चेहरा मोहरा बदलून जाणार आहे. तामशिदवाडी ढोबळेवस्ती या 80 लाखाचा रस्ता पाण्याच्या टाकीपासून तामशिदवाडी गावठाण हायस्कुल, मराठी शाळा नवनाथ वाघमोडे वस्ती, सुधीर वाघमोडे वस्तीवरून पुढे ढोबळेवस्ती असा तामशिदवाडी गावातून आहे. या निधीबद्दल आ. राम सातपुते यांचे तामशिदवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मनिषा डूबल, उपसरपंच सौ. ऐश्वर्या नरुटे, ग्रामसेवक रमेश जमदाडे व ग्रामपंचायत सदस्य व समस्त ग्रामस्थांनी आ. सातपुते भाऊ यांचे विशेष आभार मानलेत. तामशिदवाडी-मारकडवाडी उंबरे दहिगाव रस्ता यासाठी 6 कोटी रु., तीर्थक्षेत्र विकासमधून वश्या मारुती गोरेवस्ती या देवस्थानला 3 कोटी तर सावतामाळी देवस्थान तीर्थक्षेत्र शेंडेवाडी या साठी 1.50 कोट रु. असा निधी मंजूर झाला असून सदर कामे सुरू आहेत.

तर दलित वस्ती जिल्हा परिषदेकडील अनेक कामे तामशिदवाडी ग्रामपंचायतीमध्ये सुरू आहेत. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या दमदार कामगिरीवर ग्रामस्थ समाधानी आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button