Uncategorized

पंढरपुर तालुका माळी महासंघ महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सौ. वंदना आबासाहेब देवकर

पंढरपूर (बारामती झटका)

पंढरपूर तालुका माळी महासंघ महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष पदी तारापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या वंदना आबासाहेब देवकर यांची निवड नुकतीच जाहीर करणेत आली आहे. आगामी एक वर्षांकरीता ही निवड करण्यात आली आहे. माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर जांभळे यांनी त्यांची निवड जाहीर केली आहे. माळी महासंघाचे राष्ट्रिय अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे, माळी महासंघ महाराष्ट्र राज्य किसान आघाडीचे प्रदेश अध्यक्ष शंकरराव वाघमारे, पंढरपुर तालुका अध्यक्ष शाम गोडसे यांच्याशी चर्चा करून ही निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल तालुक्यातील माळी समाजात आनंद व्यक्त होत आहे. या निवडीबद्दल अविनाशजी ठाकरे, अरुणजी तिखे, शंकरराव वाघमारे, रंगनाथ नाळे, महासंघाचे विश्वस्त भारत माळी, चंद्रशेखर दरवडे, दिनेश टाकारखेडे, पंढरपूर तालुका अध्यक्ष शाम गोडसे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश राऊत आदींनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

या निवडीनंतर सौ. वंदना आबासाहेब देवकर यांनी आगामी काळात समाजातील महिलांना सोबत घेवून माळी महासंघाच्या विचाराशी जोडणार असून माळी महासंघ विचाराचा प्रचार व प्रसार होईल, असा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort