लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून अकलूज-फोंडशिरस-नातेपुते एसटी सेवा सुरू झाली….

एसटी सुरू झाल्याने खेड्यातील शेतकऱ्यांच्या मुलामुलींची उच्च शिक्षणासाठी अत्यंत चांगली सोय झालेली आहे.
सदाशिवनगर (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी अकलूज फोंडशिरस-नातेपुते—व्हाया– माळशिरस-पुरंदावडे-सदाशिवनगर-तामशिदवाडीखुळेवाडी-फोंडशिरस-नातेपुते ही या मार्गावरून प्रयत्नातून नुकतीच नवीन बस सुरू झालेली आहे. या बसमुळे फोंडशिरस-पिरळे-मोटेवाडी-तामशिदवाडी या भागातून माळशिरस-नातेपुते-अकलूज-सदाशिवनगर येथे शिक्षणासाठी दररोज ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची अत्यंत चांगली सोय झाली असून ही बस सकाळी ९ वा .नातेपुते येथून निघते. फोंडशिरस, खुळेवाडी, तामशिदवाडी, सदाशिवनगर, माळशिरस वरून १० वा. अकलूज येथे पोहोचते. परत सायंकाळी ४.४५ वा. अकलूज वरून याच मार्गाने नातेपुतेला ६ वा पोहोचते.
लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी ही बस या मार्गाने शालेय विद्यार्थी यांच्यासाठी खासबाब म्हणून सुरू करून घेतली आहे. या बसमुळे खेड्यातील शेतकऱ्यांची मुलामुलींची उच्च शिक्षणाची अत्यंत चांगली सोय झाली आहे. यामुळे विद्यार्थी व पालक वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng