धोंडेवाडीत कृषीदुतांकडून जागतिक योगदीन साजरा

पंढरपूर (बारामती झटका)
पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी गावामध्ये २१ जून २०१५ रोजी योगदिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धोंडेवाडीमध्ये जागतिक योगदिन साजरा केला.
यावेळी कृषीदुतांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थांना विविध प्रकारच्या आसनांबद्दल माहीती दिली व त्या आसनांची कृती देखील करून घेतली व दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व सांगितले.
याक्षणी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत महाजणे, शिक्षक जमदाडे सर व भोसले सर उपस्थित होते.
या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील तसेच प्राचार्य आर. जी. नलावडे आणि प्राध्यापक एस. एम. एकतपुरे (कार्यक्रम समन्वय) व प्राध्यापक एम. एम. चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.