ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची दमदार कामगिरी, तालुक्यातील विकासकामांसाठी ५ कोटींचा भरीव निधी

माळशिरस येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभीकरणास ५० लाखांचा भरीव निधी

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष  माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची सामाजिक न्याय विभागाकडून माळशिरस तालुक्यातील विविध विकासकामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दमदार कामगिरी झाली आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मंत्री मंडळातील सामाजिक न्याय विभागाकडून ५ कोटी रुपये माळशिरस तालुक्यातील ज्या विकासकामांसाठी मंजूर झाला आहे, ती विकासकामे पुढीलप्रमाणे –

मौजे गारवाड येथील साठे नगर येथे सभागृह बांधण्यासाठी दहा लाख रु., मौजे झिंजेवस्ती येथे मारुती मोरे वस्ती रस्ता करण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे बाभूळगाव येथील दलित वस्ती जिल्हा परिषद शाळा परिसर येथे सभा मंडप बांधण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे विझोरी येथील श्रीमंत गोरे वस्ती ते ओढा रस्ता करण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे चाकोरे येथील करडे वस्ती ते साठे वस्ती रस्ता करण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे धर्मपुरी येथील राजेंद्र रंधवे यांच्या घराशेजारी गावठाण जागेत महालक्ष्मी मंदिर समोर सभा मंडप बांधण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे जळभावी येथील पंचशील नगर समाज मंदिरासमोर सभा मंडप व पेवर ब्लॉक बांधण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे विजयवाडी येथील खुडूस रोड, सकट वस्ती, लक्ष्मी मंदिरासमोर सभा मंडप बांधण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे गोरडवाडी येथील नवनाथ केंगार वस्ती ते गोरे वस्ती रस्ता करण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे कारुंडे वस्ती येथील मागासवर्गीय गावठाण जागेत सौरदिवे बसवण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे तिरवंडे येथील गावठाण दलित वस्ती येथे सार्वजनिक सभागृह बांधण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे माणकी येथे होलार समाज मंदिरात सौरदिवे बसवण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे फोंडशिरस येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये मरी माता मंदिरासमोर सभा मंडप बांधण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे फडतरी येथील नाथ मंदिराचे सभा मंडप बांधण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे उंबरे दहिगाव येथे समिंदर वस्ती येथे सभा मंडप बांधण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे मांडवे येथील ढोबळे वस्ती येथे सभा मंडप बांधण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे डोंबाळवाडी खुडूस येथे पवळ वस्ती येथे सभा मंडप बांधण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे मोटेवाडी (मा) गावठाण जागेत पेवर ब्लॉक बसवण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे तरंगफळ येथील अण्णाभाऊ साठे पुतळा शेजारी सुशोभीकरण करण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे तरंगफळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी सुशोभीकरण करण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे शिंगोर्णी येथील ज्योतिबा मंदिर ते ऐवळे घर रस्ता करण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे भांब येथील आंबेडकर नगरमध्ये पेवर ब्लॉक बसवण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे दत्तनगर खंडाळी येथील कॅनॉल पट्टी मागासवर्गीय वस्ती येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे कचरेवाडी येथील गावठाण दणाणे वस्ती येथे सभागृह बांधण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे मोरोची येथील अण्णाभाऊ साठे समाज मंदिरासमोर सभा मंडप बांधण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे धानोरे येथे मागासवर्गीय वस्तीत लक्ष्मी मंदिरासमोर सभा मंडप बांधण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे पिंपरी येथील मागासवर्गीय वस्ती येथे सौर दिवे बसवण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे कोळगाव येथील मागासवर्गीय वस्ती येथे सौरदिवे बसवण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे पठाण वस्ती येथील सुनील सरतापे मागासवर्गीय वस्ती येथे सभा मंडप बांधण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे मळोली येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह बांधण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे सुळेवाडी येथील होलार वस्ती, मातंग वस्ती येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे कोथळे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह बांधण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे गुरसाळे येथील नामदेव बाजी खिलारे वस्ती येथे समाज मंदिर बांधण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे कोथळे येथील मागासवर्गीय वस्ती येथे ड्युअल सौरपंप बसवण्यासाठी पाच लाख रुपये, मौजे जाधववाडी येथील बाळू जावीर वस्ती येथे सभा मंडप बांधण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे तांबेवाडी येथील साठे नगर तुकाराम महाराज मंदिरासमोर सभा मंडप बांधण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे दहिगाव येथील अलंकापुरी दणाणे वस्ती येथे माऊली मंदिरासमोर सभामंडप बांधण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे कोंडबावी येथील साठे वस्ती येथे वेताळबाबा मंदिराशेजारी सभा मंडप बांधण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे दहिगाव रत्नतारा मंगल कार्यालय ते कसबे गेजगे वस्ती रस्ता करण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे सदाशिवनगर येथे मागासवर्गीय वस्ती येथे सभामंडप व सुशोभीकरण करण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे काळमवाडी येथील काळमवाडी मुख्य रस्ता ते नारायण वाघमारे रस्ता करण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे बचेरी येथील नारायण गोरड ते चंदनशिवे घर रस्ता करण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे कन्हेर (सरगर वाडी) येथील मधुकर धाईंजे वस्ती, चंद्रकांत मिसाळ वस्ती रस्ता करण्यासाठी दहा लाख रुपये, मौजे माळशिरस येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा शेजारी सुशोभीकरण करण्यासाठी पन्नास लाख रुपये, मौजे नातेपुते येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये सौरदिवे बसवण्यासाठी पंधरा लाख रुपये अशा विविध विकास कामांसाठी लोकप्रिय दमदार आमदार मंजूर करून दिला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

4 Comments

Leave a Reply

Back to top button