ताज्या बातम्याशैक्षणिक

वाघोलीच्या विकासासाठी निधी मिळवून देण्यास सर्वतोपरी सहकार्य करू – धैर्यशील मोहिते पाटील

संग्रामनगर (बारामती झटका) केदार लोहकरे यांजकडून

माळशिरस तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायतीच्यावतीने विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. विकासकामांचा भूमिपूजन उद्घाटन समारंभ भारतीय जनता पक्षाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांचे शुभहस्ते व अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी शिवामृत दूध उत्पादक संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की, वाघोली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून भरघोस असा निधी उपलब्ध करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी दिले.

वाघोली ग्रामपंचायतीच्यावतीने आज जनसुविधा योजने अंतर्गत स्मशानभूमी दुरुस्ती व सुशोभीकरण करणे रुपये १९ लाख रु., १५ वा वित्त आयोग अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, वाघोली रुपये २ लाख रु., साहित्य वाटप, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोली येथे पाणी टाकी बांधणे २ लाख रु., गावातील सर्व जिल्हा परिषद शाळांना स्मार्ट टीव्ही संच पुरवणे २ लाख रु., दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ते काँक्रीट करणे व बंदिस्त गटर करणे १२ लाख रु., अशा ३५ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांनी ग्रामपंचायत राबवत असलेल्या सर्व विकासकामांचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले. विकासकामांत कुठलीही अडचण आली तरी प्रशासन स्तरावर ती सोडवण्याचा सर्वोतरी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. तसेच जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती माळशिरस महाराष्ट्र शासनअंतर्गत राबवत येणाऱ्या स्कीमचा आढावा आपल्या भाषणात त्यांनी सांगितला. यावेळी पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव माने यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून गावच्या विकासासाठी विविध प्रकारच्या विविध योजनेतून निधी मिळण्याविषयी उपस्थित मान्यवरांना विनंती केली.

अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्यातून वाघोली गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा उद्योजक तुषार पाटोळे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपा अभियंता रणनवरे, शाखा अभियंता सरडे रावसाहेब, पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव माने, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, धनंजय सावंत, पोपट भोसले, महाळुंग नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील, गोविंद पवार, विनायक पराडे, संगमचे महेश इंगळे, विराज निंबाळकर, प्रशांत पाटील, दत्तात्रय चव्हाण, ग्रामपंचायतचे मार्गदर्शक विष्णू वासुदेव मिसाळ, कालिदास कृष्णा मिसाळ, वाघोली येथील रणजीतसिंह मोहिते पाटील पतसंस्थेचे चेअरमन डॉ. अमोल माने शेंडगे, ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वृषाली माने शेंडगे, उपसरपंच पंडित मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य योगेश माने, लक्ष्मण पारसे, लखन कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सौ. सुजाता बळीराम मिसाळ, हरिदास चव्हाण, विठ्ठल पाटील, मोहन शेंडगे, मारुती मिसाळ, हरिदास पाटोळे, अंकुश मिसाळ, भारत पाटोळे, सोमनाथ मिसाळ, विलास मिसाळ, सुदर्शन मिसाळ, सुनील चव्हाण, औदुंबर मिसाळ, रघुनाथ मिसाळ, सचिन पाटोळे, निलेश शेंडगे, विजय शेंडगे, प्रवीण पाटील, साहिल मुलाणी, तुकाराम मिसाळ, संतोष पवार, उमाजी मिसाळ, मारुती पाटोळे, दिगंबर मिसाळ, ग्रामविकास अधिकारी सुरेश रोडे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतचे सदस्य योगेश माने, अमोल मिसाळ, तुषार पाटोळे, माजी चेअरमन बळीराम मिसाळ, ग्रामपंचायतचे कर्मचारी मल्हारी जाधव, दादा गायकवाड, बलभीम ओहोळ, मारुती मिसाळ यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मिसाळ यांनी केले तर ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पारसे यांनी आभार मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button