Uncategorizedताज्या बातम्या

माळशिरस शहरातून पालखी मुक्काम ठिकाणी खड्ड्यात आदळत आपटत प्रवास करावा लागणार…

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी पालखी मार्गाचा दौरा केला मात्र, खड्ड्याचा रस्ता वगळून चांगल्या रस्त्याने अकलूजकडे वळले..

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे डोळे कधी उघडणार ? का वाहनधारक व भाविकांचे डोळ्यात चिलार गेल्यानंतर उघडणार.

माळशिरस ( बारामती झटका)

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झालेले आहे. माळशिरस शहरात पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग जात असून माळशिरस शहरात पालखी मुक्कामाच्या ठिकाणी जात असताना खड्ड्यात हिसक दसक देत प्रवास करावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी महामार्गाचा दौरा केलेला होता. श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा दौरा करीत असताना माळशिरसवरून खड्ड्याच्या रस्त्याने जाण्याऐवजी चांगल्या रस्त्याने अकलूजकडे वळले होते. त्यामुळे माळशिरस शहरापासून मुक्कामाच्या ठिकाणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्याचे अतिक्रमण तसेच राहिले आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक वैष्णव व भाविक भक्तांची गर्दी असते. अनेक लोक दिंडीमध्ये व दिंडी व्यतिरिक्त पाई चालत असतात. भाविकांना चालताना रस्त्यामध्ये अथवा चालताना अडचण होऊ नये यासाठी अडचणी दूर केल्या जातात. मात्र, माळशिरस शहरापासून पालखी मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत रस्त्यामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जात असताना आदळत आपटत पालखीला प्रवास करावा लागून भाविकांना त्रास सहन होणार आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावर डागडुजी व मलमपट्टी लवकर करावी, अशी भावना भाविकांमधून व्यक्त होत आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा चिलार झाडांचे रस्त्यावर अच्छादन झालेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे डोळे कधी उघडणार ? का वाहनधारक व भाविकांच्या डोळ्यात चिलाराच्या फाट्याचा चपकार लागून डोळा बाद झाल्यानंतर अधिकाऱ्यांचे डोळे उघडणार ?, असा सवाल वाहनधारक व भाविकांमधून उपस्थित केला जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort