ताज्या बातम्या

पाणीदार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते जलनायक शिवराज पुकळे यांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून सन्मान…

२६ जानेवारी २०२४ शिवराज पुकळे वाढदिवस ते १९ फेब्रुवारी २०२४ खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसापर्यंत ‘शिवराज पुकळे आपल्या दारी’ उपक्रम व २० फेब्रुवारी २०२४ रोजी आरोग्य शिबिर व शासकीय योजना शिबीर…

७ हजार कुटुंबांपेक्षा जास्त घरी जाऊन ३५ हजार लोकांना भेटून समस्या निवारण करण्याचा संकल्प

पिलीव (बारामती झटका)

पिलीव भागातील सर्वसामान्य नागरिकांची शासन दरबारी प्रलंबित असणारी व्यक्तिगत कामे, गावांतील विविध प्रश्न समजून घेऊन मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणे, भागातील लोकांना जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, विविध योजनांची माहिती देऊन त्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न, पाठपुरावा करणे, तलाठी कार्यालयापासून ते तहसील, प्रांत, कलेक्टर कार्यालयापर्यंत तसेच ग्रामसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषदपर्यंत सर्वसामान्य नागरिकांची शासनाच्या कोणत्याही विभागासंबंधी प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी “शिवराज पुकळे आपल्या दारी” या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जलनायक शिवराजभैय्या पुकळे यांचा सन्मान थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच भुजंगराव शिंगाडे यांच्या निवासस्थानी केला. यावेळी जनतेचे आमदार उत्तमराव जानकर यांच्यासह तालुक्यातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२६ जानेवारी जलनायक शिवराजभैय्या पुकळे यांचा वाढदिवस असतो. केक, हार-तुरे असा कोणताही वायफळ खर्च न करता दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रमाने वाढदिवस साजरा करीत असतात. यावर्षी ७ हजार कुटुंबांपेक्षा जास्त घरी जाऊन ३५ हजार लोकांना भेटून समस्या निवारण करण्याचा संकल्प केला आहे.

यावर्षीच्या वाढदिवसादिवशी अनोखा उपक्रम हाती घेतलेला आहे. पिलीव भागातील सर्वसामान्य नागरिकांची शासन दरबारी प्रलंबित असणारी व्यक्तिगत कामे, गावांतील विविध प्रश्न समजून घेऊन मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणे, भागातील लोकांना जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, विविध योजनांची माहिती देऊन त्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न, पाठपुरावा करणे, तलाठी कार्यालयापासून ते तहसील, प्रांत, कलेक्टर कार्यालयापर्यंत तसेच ग्रामसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषदपर्यंत सर्वसामान्य नागरिकांची शासनाच्या कोणत्याही विभागासंबंधी प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी ‘शिवराज पुकळे आपल्या दारी’ हा उपक्रमाची वाढदिवसादिवशी सकाळी ९ वाजता सुतार गल्ली, पिलीव येथुन सुरूवात करण्यात आली. याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. किरकोळ बाबींमुळे अनेकांचे रखडलेले प्रश्न सुटत आहेत.

जलनायक शिवराजभैय्या पुकळे यांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, अडचणीतील नागरिक शुभेच्छा देऊन मनातील मनोकामना पूर्ण होण्याच्या शुभेच्छा देत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort