“पिलीव नगरीमध्ये नाईक मंडळींचा श्री खंडोबा दैवताचे २१ वीरांचा खेळ व गजी ढोल कार्यक्रमाचे आयोजन”

पिलीव (बारामती झटका) रघुनाथ देवकर यांजकडून
माळशिरस तालुक्यातील पिलीव नगरीमध्ये नाईक मंडळींच्या वतीने श्री खंडोबा दैवताचे २१ वीरांचा खेळ व गजी ढोल खेळाचे आयोजन अधिक महिन्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षापासून केले जाते. चालू वर्षी सुद्धा शुक्रवार दि. २/८/२४ रोजी रात्रौ ९:०० वा. व शनिवार दि. ३/८/२४ स. ९:०० वा. तर दु. २:०० वा. पारंपारिक श्री खंडोबा दैवताच्या २१ वीरांच्या खेळाचे व गजी ढोल खेळाचे आयोजन केले आहे.
यासाठी बचेरी, सुळेवाडी, जरगवस्ती, काळामळा, धुळदेव, ढोकमोड, चांदापुरी, काळमवाडी, लेंगरे, मदने, बोरगाव अशा ठिकाणचे ढोल वादक व इतर वादकही साथ देण्यासाठी व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात. पिलीवच्या नाईक मंडळींचा श्री खंडोबाच्या २१ वीरांचा भव्य व दिव्य अशा प्रकारचा धार्मिक कार्यक्रम जिल्हा व जिल्ह्याच्या बाहेर पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. या धार्मिक कार्यक्रमासाठी अनेक कोसो दूरवरुन भाविक भक्त उपस्थित राहत असतात.

या धार्मिक कार्यक्रमाचे या भागामध्ये फार पूर्वीपासून कुतूहल व कौतुक केले जाते. हा भव्य दिव्य वीरांचा धार्मिक कार्यक्रम युवा पिढीला निश्चितच प्रेरणादायी ठरत असतो, अशा या कार्यक्रमासाठी पिलीव येथील नाईक समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये तयारी केली आहे. व या कार्यक्रमाची तालुका व जिल्ह्याच्या बाहेर उत्सुकता निर्माण झालेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.