महाळुंग विविध कार्यकारी सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

सभेचे अध्यक्ष सहकार महर्षी साखर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र आबा सावंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र उर्फ बंडू वाळेकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संपन्न
महाळुंग (बारामती झटका)
महाळुंग विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित महाळुंग, ता. माळशिरस या सोसायटीची 93 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र आबा सावंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

यावेळी संस्थेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र उर्फ बंडू वाळेकर यांनी संस्थेचा लेखाजोखा वाचून दाखविला. तसेच यावेळी संस्थेच्या नफ्यातून सभासदांना 11.55% लाभांश जाहीर करण्यात आलेला आहे. सदरचा लाभांश घटस्थापनेनंतर सभासदांना वाटप करण्यात येणार आहे. सर्व विषय उपस्थित सर्व सभासदांनी एकमताने मंजूर करून सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे.
यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र आबा सावंत पाटील होते. यावेळी सुरेश आप्पा गुंड पाटील, राहुल रेडे पाटील, दादासाहेब लाटे, रावसाहेब सावंत पाटील, शिवाजीराव रेडे, बाळासाहेब भगत, पांडू तात्या मुंडफणे, शशांक मुंडफणे पाटील, सुरेश खंडागळे, मदन भगत, संजय भगत, मौलाभाई पठाण, पांडुरंग इंगळे, बासूभाई डांगे, विलास रेडे पाटील, रत्नाकर झगडे, विक्रमसिंह लाटे आदी मान्यवरांसह संस्थेचे आजी-माजी संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng