वेळापूर येथे ‘शायनिंग महाराष्ट्र’ या भव्य प्रदर्शनाचे आयोजन
वेळापूर येथील शिवशंभो मंगल कार्यालय येथे २२, २३ व २४ डिसेंबरपर्यंत केंद्रभूत सुविधांचे मोफत भव्य प्रदर्शन
वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर ता. माळशिरस येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सबका साथ सबका विकास, सबका विश्वास या ब्रीद वाक्यावर महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभेचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा प्रभारी व प्रांतिक सदस्य के. के. पाटील यांच्या सहकार्याने ‘शायनिंग महाराष्ट्र’ या भव्य प्रदर्शनाचे आयोजन गुरुवार दि. २२, २३ व २४ डिसेंबर २०२२ पर्यंत शिवशंभो मंगल कार्यालय, पुणे-पंढरपूर रोड, वेळापूर, ता. माळशिरस येथे होणार आहे.
सदरच्या भव्य प्रदर्शनामध्ये मोफत प्रवेश असून सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शायनिंग महाराष्ट्र भव्य प्रदर्शनामध्ये केंद्रभूत विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला इत्यंभूत माहिती हवी, वेगवेगळ्या भागातील उत्पादित मालाची खरेदी करता यावी यासाठी तीन दिवस मोफत भव्य प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी, शेती, पर्यावरण व पाण्याचा पुनर्वापर, आरोग्य व औषधे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, स्पेस सायन्स, कॉमर्स अँड ट्रेड, भूगर्भशास्त्र व खणन, आयटी अँड कम्युनिकेशन, टुरिझम असे अनेक नाविन्यपूर्ण माहिती असणारे व वेगवेगळ्या भागातील गृह उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शनाचे सासां फाउंडेशन यांनी आयोजन केलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
What a fantastic read! The humor made it even better. For further details, check out: READ MORE. Any thoughts?