ताज्या बातम्याराजकारण

राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांचा माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात डिजिटलवर फोटोच नाही

माळशिरस नगरपंचायतीच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. दीपकआबा साळुंखे पाटील व मोहोळचे आ. यशवंततात्या माने यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस नगरपंचायतीच्या विविध विकासकामांचा शुभारंभ रविवार दि. १० मार्च २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मोहोळ विधानसभेचे लोकप्रिय आमदार यशवंत तात्या माने यांच्या प्रमुख उपस्थितीसह माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मात्र, राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांचा माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात डिजिटलवर फोटोच नाही. विशेष म्हणजे माळशिरस शहरात कार्यक्रमापूर्वी उत्तमराव जानकर यांचे आगमन झालेले होते. कार्यक्रमाच्या डिजिटल वर फोटोच नाही तर कार्यक्रमास उपस्थिती सुद्धा नाही, याची उलटसुलट चर्चा माळशिरस पंचक्रोशीत सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील व सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अजितदादा पवार यांचे विश्वासू सहकारी सुरेशआबा पालवे पाटील यांनी माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष शिवाजीराव ज्ञानदेव देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड केलेली होती. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादीचे दोन स्वतंत्र गट तयार झाल्यानंतर माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक उत्तमराव जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटासोबत राहिलेले होते. अजितदादा पवार यांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्याच्या वेळी राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर व्यासपीठावर उपस्थित होते.

माळशिरस नगरपंचायत विविध विकासकामांच्या शुभारंभाच्या व्यासपीठावरील डिजिटलवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, अजितदादा पवार, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तामामा भरणे, करमाळा विधानसभेचे आमदार संजयमामा शिंदे, मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत तात्या माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेशआबा पालवे पाटील, माळशिरसचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य ज्येष्ठ नेते तुकारामभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अशोकदादा देशमुख यांच्या फोटोसह नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख व उपनगराध्यक्ष कोमल जानकर यांचे फोटो डिजिटलवर होते. सदरच्या कार्यक्रमास भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुक्यातील नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या लोकांमध्ये राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांचा डिजिटलवर फोटो नाही व कार्यक्रमास उपस्थित नाहीत, याची उलट सुलट चर्चेची कुजबुज सुरू होती.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button