ताज्या बातम्याराजकारण

शरदचंद्र पवार, देवेंद्रजी फडणवीस आणि रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे राजकीय सुसंस्कृतपणाचे आचरण जनतेने पाहिले…

सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे माजी कृषीमंत्री स्व. डॉ. गणपतराव उर्फ आबासाहेब यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रम प्रसंगी…

सांगोला (बारामती झटका)

देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्रजी फडवणीस यांच्या शुभ हस्ते सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री स्वर्गीय डॉक्टर गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमाप्रसंगी शरदचंद्रजी पवार, देवेंद्रजी फडवणीस, रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे राजकीय सुसंस्कृतपणाचे आचरण जनतेने पाहिलेले आहे. राजकारणात राजकारण मात्र समाजात वावरत असताना एकमेकांचा आदर करण्याची संस्कृती तिन्हीही नेत्यांनी जपलेली असल्याने सर्वसामान्य जनतेत अशा नेत्यांच्या प्रसंगानुसार वागण्याची चर्चा होत असते.

स्व. डॉ. भाई गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून राजकारण व समाजकारण केलेले आहे. सर्व पक्षाशी भाई गणपतराव देशमुख यांचे सलोख्याचे व मैत्रीची संबंध होते. त्यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमास देशमुख परिवार यांनी सर्व राजकीय पक्षांचे नेते, आजी माजी मंत्री, खासदार, आमदार यांना निमंत्रित केलेले होते. भव्य व्यासपीठ उभारलेले होते. व्यासपीठावर मान्यवरांचे आगमन झालेले होते, त्यावेळेस सांगोला विधानसभेचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांना चालण्याचा त्रास असल्याने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सोबत माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर होते. व्यासपीठावर आल्यानंतर निमंत्रण पत्रिकेव्यतिरिक्त इतर नेते खुर्च्यांवर बसलेले होते. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची खुर्ची पहिल्या रांगेत होती मात्र, शहाजीबापू पाटील यांना बसण्यास खुर्ची आणण्यात येईपर्यंत उभा राहिलेले होते. त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या राजकीय सुसंस्कृतपणाचे आचरण जनतेने पाहिलेले आहे.

कार्यक्रमाला भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक झाल्यानंतर अतिथी देवो भव या न्यायाने उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे नाव सत्कारासाठी घेतल्यानंतर कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस सत्काराच्या वेळी उठून उभा राहिलेले होते. पवार साहेबांचा सन्मान झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सत्कारासाठी नाव पुकारल्यानंतर शरदचंद्रजी पवार यांनी शाल व गुच्छ टिपाईवर ठेवून उभा राहिलेले होते. त्यावेळेस देवेंद्रजी फडवणीस यांनी त्यांना आदराने बसण्याची विनंती केली. उपस्थित सर्व लोकांनी नेत्यांचे राजकीय मतभेद बाजूला सारून एकमेकांचा आदर, सन्मान व राजकीय सुसंस्कृतपणाचे आचरण जनतेने पाहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button