चाकोरे येथे ह. भ. प. अमोल महाराज सूळ, मोरोची यांचे सुश्राव्य किर्तन होणार

कै. दादासो वाघमोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
चाकोरे (बारामती झटका)
चाकोरे ता. माळशिरस, येथे कै. दादासो माणिकराव वाघमोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन शनिवार दि. 31/8/2024 रोजी चाकोरे, प्रतापनगर, कुरणवस्ती बंगला येथे संपन्न होणार आहे. या पुण्यस्मरणानिमित्त मोरोची येथील ज्ञानवैभव वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह. भ. प. अमोल महाराज सूळ यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

तरी नजरचुकीने आमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करण्याचे आवाहन वाघमोडे परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.