सुप्रसिद्ध हवामान शास्त्रज्ञ पंजाबराव डख यांच्या चर्चासत्रात शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
नातेपुते येथे फार्मसन्स ॲग्री सोल्युशन्सकडून डाळिंब, द्राक्ष, केळी व्यवस्थापन व चर्चासत्र शेतकऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न
नातेपुते (बारामती झटका)
फार्मसन्स ॲग्री सोल्युशन प्रा. लि. नाशिक व माळशिरस आणि इंदापूर तालुका डीलर यांच्या संयुक्त विद्यमाने डाळिंब, द्राक्ष, केळी व्यवस्थापन चर्चासत्राचे आयोजन नातेपुते येथील राजवैभव सांस्कृतिक भवनात करण्यात आले होते. या आयोजित चर्चासत्रामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक असणारे श्री. पंजाबराव डख यांच्या शुभहस्ते श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर दीपप्रज्वलन धुळदेव कॉरिडॉर संघर्ष समितीचे अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ अण्णा वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी फार्मसन्स कंपनीचे एम.डी. जयेश शेवाळे, एरिया सेल्स मॅनेजर पंढरीनाथ औटी, ॲग्रोनॉमिस्ट एजाज आतार यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
या वेळी चर्चासत्रात परिसरातला शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाची सुरुवात यावेळी प्रमुख पाहुणे पंजाबराव डख, फार्मसन्स कंपनीचे जयेश शेवाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आंदोलन वीर अजितभैया बोरकर, जननायक शिवराज पुकळे, साहिलजी आतार, सोमनाथ पिसे, बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील, विजय बरडकर, राजेंद्र बरडकर, सचिन फुले आदी मंडळी उपस्थित होती.



सततच्या बदलत्या वातावरणात निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण डाळिंब, द्राक्ष, केळी यासारख्या फळबागांचे उत्पन्न शाश्वत पद्धतीने कसे वाढवावे, या सतवणाऱ्या प्रश्नाचे उत्तर शेतकऱ्यांना मिळत असल्याने शेतकरी वर्गातून आयोजित चर्चासत्राबद्दल समाधान व्यक्त होत आहे. सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन करून शेतकऱ्यांच्या मनामधील शंका कुशंका काढून टाकलेल्या आहेत.


सदर कार्यक्रमाला शेतकरी वर्गातून उदंड प्रतिसाद मिळालेला होता. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधू राऊत यांनी केले होते तर आभार एजाज आतार यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
