चि. सौ. कां. प्राजक्ता ठवरे पाटील, खुडूस व चि. चैतन्य टेळे, सिदाचीवाडी यांचा शाही शुभविवाह होणार संपन्न

श्री. तात्यासाहेब ठवरे पाटील आणि श्री. विठ्ठल टेळे यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत जुळणार
खुडूस (बारामती झटका)
श्री. ज्ञानदेव शिवाजी ठवरे पाटील यांची नात व श्री. तात्यासाहेब ज्ञानदेव ठवरे पाटील रा. खुडूस, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. प्राजक्ता (B.P.M.T.) आणि श्री. महादेव गंगाराम टेळे यांचे नातू व श्री. विठ्ठल महादेव टेळे रा. सिदाचीवाडी, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चिरंजीव चैतन्य (B.Sc. D.M.L.T.) यांचा शाही शुभविवाह सोहळा मंगळवार दि. २८/११/२०२३ रोजी दुपारी १ वा. ५ मि. या शुभमुहूर्तावर भगवंत मंगल कार्यालय, सदाशिवनगर नजीक, जाधववाडी रोड, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.
तरी या शाही शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद देण्याची आग्रहाची विनंती सौ. निलावती व श्री. ज्ञानदेव शिवाजी ठवरे पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य, खुडूस, सौ. रंजना तात्यासाहेब व श्री. तात्यासाहेब ज्ञानदेव ठवरे पाटील माजी सरपंच, ग्रामपंचायत खुडूस यांच्या वतीने करण्यात आले आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत नजर चुकीने आपणास आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे. तरी सर्व आप्तेष्ट, नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ठवरे पाटील आणि टेळे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.