शाहू फाउंडेशनच्यावतीने लेखिका/कवी सौ. माया सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
अकलूज (बारामती झटका)
आज अकलुज (राऊतनगर) येथे शाहू फाउंडेशनच्यावतीने अध्यक्ष अविनाश भैय्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली लेखिक/कवी मा.सौ. माया सुर्यवंशी (मुंबई) यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी किशोर नाना घोलप यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून झाडांना पाणी घालण्यात आले. यावेळी महेंद्र आण्णा अडगळे आणि सोमनाथ भाऊ परदेशी आवर्जून उपस्थित राहिले.
सदर कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीत आणि उत्साहपुर्ण वातावरण पार पडला. सदर कार्यक्रमासाठी लखन पवार, विक्रम शिंदे, अजय धुमाळ, नाना भोसले, कबीर मुलाणी, आणि इतर कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच या कार्यक्रम पार पाडण्यासाठी अमरभैय्या सोनके यांनी मोलाची मदत केली. सदर कार्यक्रमावेळी उपस्थितांचे आभार शाहू फाउंडेशनचे अध्यक्ष अविनाश भैय्या सोनवणे यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng