श्रीपूर येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयाचा १० वीचा ९९.११% निकाल
प्रशालेतील एकूण २२४ पैकी २२२ विद्यार्थी उत्तीर्ण, शेकडा निकाल ९९.११%
श्रीपूर (बारामती झटका)
श्रीपूर ता. माळशिरस येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयाचा इ. १० वी चा ९९.११ टक्के निकाल लागला आहे. प्रशालेतील एकूण २२४ पैकी २२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रशालेतील प्रथम पाच विद्यार्थी
१) कु. मोरे श्रावणी उमेश – ९६.८० %
२) कु. नकाते मानसी सिद्धलिंग – ९६.२०%
३) कु. डोळे आकांक्षा अतुल – ९५.२०%
४) कु. बेंद्रे प्रतिक्षा समीर – ९५.००%
५) चि. काटकर ज्ञानदीप कैलास – ९३.४०%

प्रशालेतील मागासवर्गीय प्रथम तीन क्रमांक
१) कु. बेंद्रे प्रतिक्षा समीर – ९५.००%
२) कु. भोसले चैतन्या विनोद – ९०.२०%
३) कु. रणपिसे स्मार्थना महेश – ८८.६०%
यामध्ये ७५% पेक्षा जास्त मार्क असणारे १०२ विद्यार्थी, ६०% पेक्षा जास्त मार्क असणारे ९४ विद्यार्थी तर ४५% पेक्षा जास्त मार्क असणारे २६ विद्यार्थी आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. रामदासजी देशमुख साहेब, उपाध्यक्षा व माजी उपसभापती पंचायत समिती माळशिरस सौ. शुभांगीताई देशमुख, सचिव श्री. भारत कारंडे, सदस्य श्री. यशराज रामदास देशमुख, प्राचार्य श्री. पांडुरंग बापू बनसोडे, पर्यवेक्षक श्री. न. ह. अधटराव, क. महा. प्रमुख श्री. सु. मा. गवळी, सं. मान्य पर्यवेक्षक श्री. सि. भा. गुरव व प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांच्यावतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng