श्री साई समर्थ हॉस्पिटल नातेपुते येथे वयाच्या 59 वर्षी महिलेने दिला बाळाला जन्म.
नातेपुते (बारामती झटका राजकुमार गोफणे यांजकडून)
वैद्यकीय क्षेत्र हे नाविन्यपूर्ण तसेच प्रचंड वैशिष्ट्यपूर्ण घडामोडींनी व्यापलेलं आहे. यात तुम्ही जेवढं संशोधन कराल तेवढे पुढं जाता. अगदी असाच प्रकार नातेपुते येथील श्री साई समर्थ हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. साईनाथ भोसले व डॉ. अपर्णा आढाव-भोसले यांच्या बाबतीत घडला आहे.
एक महिला मुल होत नसल्याने त्यांच्याकडे उपचारासाठी आली. परंतु, तिचे वय 59 वर्षे आहे हे माहित असूनही वंध्यत्वावर खात्रीशीर उपचार पद्धती शोधणाऱ्या व हजारो कुटुंबांना यशस्वी उपचार करणाऱ्या डॉ. भोसले दाम्पत्यांनी ते शिवधनुष्य पेललं. त्या महिलेवर उपचार सुरू केले व एक वैद्यकीय आश्र्चर्य संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले, ते म्हणजे नातेपुते येथे वयाच्या 59 वर्षी महिलेने एक सुंदर गोंडस बाळाला जन्म दिला.
मुळचे फोंडशिरस व सध्या नातेपुते तसेच धर्मपुरी येथे अहोरात्र वैद्यकीय सेवा देणारे डॉ. साईनाथ भोसले हे खुप कष्टाळू असुन प्रामाणिकपणे पत्नी डॉ. अपर्णा आढाव भोसले यांच्यासह नातेपुते येथे एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालवतात. वंध्यत्व निवारणासाठी त्यांनी विशेष उपचारपद्धती शोधून काढली आहे. अतिशय कष्टाने गरिबीतून वैद्यकीय शिक्षण घेत त्यांनी नातेपुते सोलापूरसह संपूर्ण पश्र्चिम महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रात मोठं नाव कमावलं आहे. त्यांच्या श्री साई समर्थ हॉस्पिटल नातेपुतेमध्ये महिलेला मुलगी झाली तर, संपूर्ण वैद्यकीय सेवा मोफत दिल्या जातात, हे वैशिष्ट्य आहे.
आई वडिलांनी अत्यंत गरिबीतून डॉ. साईनाथ यांना वैद्यकीय शिक्षण दिले आहे. त्याचबरोबर एक बहिण डॉक्टर व एक बहिण फाईन आर्ट तसेच मुर्तीकलेच्या क्षेत्रात उच्च विद्याविभूषित पीएचडी असुन प्रोफेसर पदावर कार्यरत आहेत. एक मेहुणे डॉक्टर व एक प्रोफेसर आहेत.
अशा उच्चविद्याविभूषित शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून डॉ साईनाथ भोसले येतात तर त्यांच्या पत्नी डॉ. अपर्णा आढाव भोसले या भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा येथील कै. संजय गांधी विद्यालय गुणवरे व मठाचीवाडी हायस्कूल मठाचीवाडीचे माजी प्राचार्य व सन्मती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित फलटणचे संचालक श्री. आनंदराव आढाव सर यांच्या कन्या आहेत.
सामाजिक भान व आपणही समाजाचं काही देणं लागतो या उदात्त हेतूने व तशीच पार्श्र्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या या दोन्ही उभयतांना नातेपुते येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, नातेपुते डॉक्टर व मेडिकल असोसिएशन यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. वरील कामी डॉ. साईनाथ भोसले यांना स्त्रीरोग तज्ञ डॉ. महावीर गांधी व भूलतज्ज्ञ डॉ. शिरिष चौधरी यांचे सहकार्य लाभले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng