विजयसिंह मोहिते पाटील यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन आपुलकीचे संबंध जोपासले – प्रा. मारुती जाधव
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किसान सेलचे प्रदेश सरचिटणीस प्रा. मारुती जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
वाघोली ( बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी कधीही पक्षीय राजकारण न करता सर्वसामान्य जनतेबरोबर सलोख्याचे संबंध ठेवले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किसान सेलचे प्रदेश सरचिटणीस प्रा. मारुती जाधव यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
दि. 11 रोजी प्रा. मारुती जाधव (पळशी, ता. पंढरपूर) यांनी आपले परस बागेतील पावसाळी हंगामात येणाऱ्या आंब्याची पेटी अकलूज ता. माळशिरस येथील विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर भेट दिले. मा. विजयसिंह मोहिते पाटील व मोहिते पाटील परिवाराचा सोलापूर जिल्ह्याच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असून संपूर्ण मोहिते पाटील परिवाराने कधीही पक्षीय राजकारण न करता सर्वांबरोबर सलोख्याचे संबंध ठेवले आहेत.

पळशी ता. पंढरपूर येथील कै. दत्तात्रय नाना जाधव, कै. कृष्णात जाधव, कै. भानुदास जाधव व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तसेच पै. दगडू नाना जाधव व पळशीकर यांचेही सलोख्याचे संबंध होते. तीन पिढ्याचे मोहिते पाटील यांनी पक्षीय राजकारण न करता सलोख्याचे संबंध ठेवल्याने विजयसिंह मोहिते पाटील व त्यांच्या परिवाराचे आभार मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng