संत्री आणि मोसंबी यामधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना फरक कळत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण कशी कळणार ?
माळशिरस ( बारामती झटका )
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कितीतरी संचालकांना संत्री आणि मोसंबी यामधील फरक कळत नाही, अशा संचालकांना शेतकऱ्यांच्या हिताचे असणाऱ्या प्रश्नाची जाण कशी कळणार ? दिवसेंदिवस सचिव आणि कर्मचारी मालामाल होत चाललेले आहेत. असा शेतकरी मतदार यांच्यामधून सवाल उपस्थित केला जात आहे.
सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज संचालक पदासाठी अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांची असणारी हक्काची सहकारी संस्था समजली जाते. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे संचालक, व्यापारी व हमाल तोलार यांना मतदानाचा अधिकार आहे. शासनाने ग्रामपंचायत मतदार संघ व सहकारी संस्था मतदारसंघात शेतकरी खातेदार असतील त्यांना निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहण्याची संधी मिळालेली आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मतदान पाहिजे होते. कारण बाजार समितीमधील सत्ताधारी आपल्या बगलबच्चांना उमेदवारी देऊन राजकारण करीत असतात. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची संस्था आहे. शेतकऱ्यांना या संस्थेपासून शेतीविषयी मार्गदर्शन, शेतीतून उत्पादित झालेला माल, खरेदी विक्री या मधून फायदा, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत असते. यासाठी खऱ्या अर्थाने शेतकरी किंवा शेतीतील फळांची, पिकांची माहिती असलेल्या लोकांना कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक पदावर काम करण्याची संधी मिळायला हवी आहे. ज्यांना संत्री आणि मोसंबी यामधील फरक कळत नाही असेच लोक संचालक पदावर जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. सत्ताधारी राजकर्त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताचे संचालक घेऊन शेतकऱ्यांची हक्काची असणारी एकमेव संस्था कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. यावर संचालक घेत असताना काळजी घ्यावी अन्यथा, मतदार गव्हातील खडे बाजूला काढल्यासारखे उमेदवारांची अवस्था करतील असा शेतकरी मतदार यांच्यामधून सूर निघत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
nIJBMqdQDWwjQJQOxj
Najlepsza aplikacja do kontroli rodzicielskiej, aby chronić swoje dzieci – potajemnie tajny monitor GPS, SMS-y, połączenia, WhatsApp, Facebook, lokalizacja. Możesz zdalnie monitorować aktywność telefonu komórkowego po pobraniu i zainstalowaniu apk na telefonie docelowym. https://www.mycellspy.com/pl/
Wow, awesome weblog format! How lengthy have you been blogging for?
you make running a blog look easy. The full look of your site is excellent, as neatly as the content!
You can see similar here sklep internetowy
Great article! The depth of analysis is impressive. For those wanting more information, visit: LEARN MORE. Looking forward to the community’s thoughts!