ताज्या बातम्याराजकारण

रणजीतसिंह मोहिते पाटील यांना भाजपचे कुंकू आहे मात्र, सुवासिनीचा मान नाही, अशी शिवरत्नची राजकीय अवस्था झाली आहे…

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे महायुती उमेदवार राजाभाऊ राऊत यांच्या समवेत माळशिरस तालुक्यातून माजी आमदार राम सातपुते व माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांना मानाचे पान…

सोलापूर (बारामती झटका)

महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार बार्शी विधानसभेचे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांना अधिकृत उमेदवार घोषित केलेले आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. माळशिरस तालुक्यातून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक नातेपुते नगरीचे ज्येष्ठ नेते शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांना मानाचे पान मिळालेले आहे. भाजपचे माजी विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपचे कुंकू आहे मात्र, सुवासिनीचा मान नाही अशी राजकीय अवस्था झाली असल्याची सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे..

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात शिवरत्न बंगला येथून राजकीय घडामोडी घडत असतात मात्र, पक्षाशी गद्दारी केल्यानंतर पक्षाने गद्दारांना बाजूला ठेवण्यासाठी व्युहरचना रचलेली आहे.

मान खटाव दुष्काळी भागाचे जलनायक पाणीदार लोकप्रतिनिधी जयकुमार गोरे यांना महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री करून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी देऊन सर्व सूत्रे हाती दिलेली आहेत. सोलापूर महानगरपालिका व सोलापूर जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये ठेवण्यात यश आलेले आहे.

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सुरू झाल्यापासून उमेदवारीची चर्चा सुरू होती. अशातच राजाभाऊ राऊत यांना महायुती मधील भाजपची अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे. आजपर्यंत शिवरत्न मोहिते पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात कार्यकर्त्यांवर अन्याय करून बगलबच्च्यांना संधी दिलेली होती. खऱ्या अर्थाने सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती निवडीच्या वेळी मोहिते पाटील यांना वगळून केलेले असल्याने सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्यांना संधी मिळालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी अंतर्गत बंडाळी करून काही हाताशी लागत आहे का याचीही चाचणी सुरू आहे. मात्र, भारतीय जनता पार्टीने रणजीतसिंह मोहिते पाटील यांना वगळून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वांना सामावून घेतलेले आहे. विशेष म्हणजे महायुतीतील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी उमेदवारी अर्ज दाखल करताना समवेत होते…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button