Uncategorized

सदाशिवराव माने विद्यालय अकलूज माजी विद्यार्थ्यांचा मेळावा.

अकलूज ( बारामती झटका)

सदाशिवराव माने विद्यालय अकलूज माजी विद्यार्थ्यांचा मेळावा जुनी अकरावी शेवटची बॅच जमली पन्नास वर्षांनी एकत्र 1968 ते 72 च्या कालावधीमध्ये जे विद्यार्थी विद्यार्थिनी सदाशिवराव माने विद्यालयामध्ये शिक्षणासाठी होते त्यांचा स्नेह मेळावा अकलूज येथे मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला सोशल मीडिया वरून संपर्क साधत मित्र-मैत्रिणींना एकत्र करण्याचा प्रयत्न ज्योती वैद्य यांनी केला आणि तिच्या प्रयत्नास यश येऊन 40 विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र जमले या मेळाव्यासाठी तत्कालीन मुख्याध्यापक आनंदराव बहिरजी पाटील सध्या वय 93 यांची उपस्थिती विशेष महत्त्वाची ठरली यांना बोलवण्याचे नियोजन करून वय 93 वर्ष असूनही प्रकृती ठणठणीत आवाज खणखणीत चालणे आणि बोलणे मोठा दिमाकदार अशा व्यक्तिमत्त्वाचे सहवास लाभला रविवारी शाळेवर सकाळी एकत्र जमलो एक एक करून जेव्हा सर्व मित्र-मैत्रिणी जमू लागलो तेव्हा खूप आनंद झाला किती दिवसातून भेटलोय ओळखू येत नाही अशा गप्पा सुरू झाल्या आणि प्रमुख पाहुणे माजी मुख्य मुख्याध्यापक पाटील सरांचे आगमन झाले सर्वांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

सरांची पूर्वीच्या कार्यालयामध्ये सरांना बसून त्यांच्या शुभहस्ते सरस्वती देवी व सहकार महर्षी शंकराव मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर नंतर जमलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी वर्गात गेले वर्गात केल्यानंतर आठवणींना उजाळा आला ही माझी जागा मी तिथे बसत होतो अशा सर्वांच्या प्रतिक्रिया व्यक्त होत्या वर्गात असतानाच आमच्या शिक्षिका निर्मले मॅडम वय 84 यांचे आगमन झाले सर्वांनी एक साथ उभे राहून त्यांचे स्वागत केले तर नंतर आम्ही मुख्य कार्यक्रम साठी हॉलवर गेलो तेथे आम्हास शिकवणारे शिक्षक अशोक पंडित सर एस एम जाधव जेजे कदम सर जगताप सर निर्मले मॅडम आणि प्रमुख पाहुणे पाटील सर यांच्या सन्मान करण्यात आला आणि प्रत्येकाने आपला परिचय देत सध्या आपण काय करतो शिक्षण सोडल्यानंतर काय उद्योग सुरू केले आहेत याची थोडक्यात परिचय दिला यामध्ये अजित खडके हे पोलीस खात्यामध्ये पीएसआय पदावरून निवृत्ती झालेले आहेत तर रोहित गांधी हे मोठे केमिकल फॅक्टरी चे मॅनेजर आहेत विजय शिंदे हे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक तसेच शिक्षण प्रसारक मंडळाच्या अनेक संस्थांवर संचालक म्हणून रुजू आहे तर बाळासाहेब सणस हे अकलूज ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच म्हणून कार्यरत होते सामाजिक व सहकारी संस्थांवर संचालक पदी कार्यरत आहेत सुधाकर कुंभार सहकारी साखर कारखान्याच्या उच्च पदावर काम करून निवृत्त झाले आहे दीपक निर्मळे शासकीय सेवानिवृत्त आहेत चंद्रशेखर गुळवे शेतकरी आहेत अजित माने उद्योजक आहेत दिलीप जोशी जिल्हा परिषद मधून निवृत्त झाले आहेत सुनील दोशी हे अकलूज किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष आहेत हे परिचय करून देत असतानाच महिला भगिनी ही या मागे नाहीत वनिता आर्वे या वकील आहेत तर सुवर्णा गवसाने निवृत्त मुख्याध्यापिका आहे बाकी सर्वजणी आपला संसार सांभाळत आहेत परिचयाच्या नंतर मनोगत व्यक्त करताना कदम सर यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी सुख आणि समाधान मानावे असे सांगितले तर जगताप सर यांनी आपल्या शिस्तप्रिय भाषणात शिस्तीचे महत्व सांगितले प्रमुख पाहुणे पाटील सर यांनी आपल्या वयाचे रहस्य सांगत असताना हरी ,वरी, करी या नियमांचा पालन आपण केले आहे हरी म्हणजे अति घाई नको वरी म्हणजे ध्यान व प्राणायाम करी म्हणजे अति तेलकट तिखट खाणे टाळणे यामुळे स्वच्छ व निरोगी आहोत आजही 93 व्या वर्षी माझी प्रकृती ठणठणीत असून मी चालू शकतो बोलू शकतो ऐकू शकतो आपल्या आठवणी सांगत असताना मी येथे दहा वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम अकलूजला एसएससी बोर्डाचे परीक्षा केंद्र सुरू केले त्याच्यानंतर कॉलेजला मान्यता मिळाली असल्याचे त्यांनी आठवण सांगितले सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की प्रचंड इच्छाशक्ती असणारा माणूस एखादी गोष्ट करायची म्हटले की ती पूर्ण करायची शैक्षणिक बाबतीतही त्यांनी असेच पावले उचलली त्यामुळेच आज अकलूजच्या शैक्षणिक कार्याचा विकास झाला शिक्षणामुळे समाज परिवर्तन व प्रगती घडली आहे सुमारे पन्नास वर्षानंतर मला पुन्हा माझ्या शाळेत येण्याचा योग आल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला या कार्यक्रमास सध्या सर्व निवृत्ती जिवन जगत असलेले विद्यार्थी महावीर जोशी भारत शिंदे सुनील दोशी डॉक्टर दिलीप जोशी
ज्योती सुधीर पंडित ज्योती श्रीकांत वैद्य अकलुज सद्ध्या सोलापूर विजय मला देशमुख फलटण
, निता फडे, त्रिशला दोशी फलटण, सुनीता गांधीं राजकुमारी दोशी, मिलन चंकेश्वरा, नातेपुते, सुनीता आर्वे, नुतन शहा कोठारी, बारामती मीना पाटील, बारामती, शैला राकले नाशिक, वेदवाणी राकले लातुर, रंजना व बाळासाहेब सणस, माधवी गांधी,लता फडे सुवर्णा फडे, सुनीता शिंदे अकलुज माधवी फडे गांधी राजकुमारी दोशी राजश्री पताळे सुजाता इनामके नवीन चौधरी सुनिता शिंदे सुनीता झगडे मीना पाटील अरुणा गायकवाड या मित्र-मैत्रिणींनी सहभाग घेतला कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करून जे बालमित्र शिक्षक सध्या हयात नाहीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली
, संपूर्ण दिवस हा जुन्या आठवणींना उजाळा देत हसत खेळत समारोप करण्यात आला सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्ण गवसाने व वनिता आर्वे यांनी केले
.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort