सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत ग्रामस्वराज्य समाज कल्याण केंद्राचे उद्घाटन
अकलूज (बारामती झटका)
अकलूज ता. माळशिरस येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च, शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्याकरीता महाविद्यालयामध्ये दि. २७/०६/२०२३ रोजी ग्रामस्वराज्य समाज कल्याण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामस्वराज्य समाज कल्याण केंद्राच्या उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून शंकरराव मोहिते महाविद्यालय, माळेवाडी, अकलूजचे माजी प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे, कार्यालयीन अधिक्षक शब्बीर शेख सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रामस्वराज्य समाज कल्याण केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कृषी, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांना याचा फायदा होणार आहे. तरी या केंद्राचा ग्रामीण भागातील नागरीकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून मेकॅनिकल अभियांत्रिकीचे विभागप्रमुख प्रा. सोमनाथ पिसे, इलेक्ट्रीकल अभियांत्रिकीचे विभागप्रमुख प्रा. सुरज शिंदे व प्रा. योगेश शेटे यांनी काम पाहिले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng