सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांचे माळशिरस तालुक्यात भाजपच्या वतीने जंगी स्वागत…
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांचे श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी महामार्गाच्या दौऱ्यावेळी माळशिरस तालुक्यात आगमन झाल्यानंतर माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह येथे भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुक्याच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्याबरोबर असणारे दौंडचे आमदार राहुल कुल यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, के. के. पाटील, भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष, भारत सरकार दूरसंचार सोलापूर निमंत्रित सदस्य सोपान (काका) नारनवर, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व नीरा देवधर संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सरगर, भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, माळशिरस नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक आकाश सावंत, युवा मोर्चाचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष युवा नेते युवराज वाघमोडे, इस्लामपूर विकास सेवा सोसायटीचे संचालक ज्येष्ठ नेते महादेवराव पवार, चिटणीस हनुमंत कर्चे, मिनीनाथ मगर आदींसह तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Insightful read! I found your perspective very engaging. For more detailed information, visit: READ MORE. Eager to see what others have to say!