शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत दहावीच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेह संमेलन संपन्न…

अकलूज (बारामती झटका)
अकलूज, ता. माळशिरस येथील महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगरच्या इयता दहावी २००५ बॅच च्या माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींचा स्नेह संमेलन कार्यक्रम संपन्न झाला.
प्रिय अशी हि माझी शाळा,
तिच्यावर मी काय लिहावे,
महती तिची गाता गाता,
शब्दांनीही कमी पड़ावे
आपली शाळा सगळ्यांना एकदम प्रिय असते. शाळा म्हणजे फक्त भिती नसुन ती आपली माय असते. आपल्या शाळेच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर च्या इयता दहावी २००५ बॅच ने माजी विद्यार्थी स्नेह संमेलन महर्षी प्रशालेत आयोजित केले होते. यावेळी २००५ साली असणारे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व ५७ माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
सर्वप्रथम सर्व विद्यार्थी महर्षी प्रशालेच्या मैदानावर उपस्थित झाले. त्यानंतर रस्सीखेच कार्यक्रम झाला. त्यानंतर शाळेची बेल वाजवण्यात आली. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी वर्गात उपस्थित झाले. तिथे राष्ट्रगीत व प्रार्थना झाली. यावेळी महर्षि प्रशाला शाळेसाठी २ प्रोजेक्टर भेट म्हणून दिले. त्याच बरोबर एक सामाजिक बांधिलकी म्हणून पंढरपूर येथील पालवी या एड्स बाधित मुलांच्या संस्थेला शाळेतील विद्यार्थ्यांना दैनंदीन शिक्षणामध्ये मदत व्हावी म्हणून फर्निचर व स्टेशनरी स्वरूपात मदत केली.

याप्रसंगी २००५ बॅचचे मुख्याध्यापक खताळ सर सोबत बॅचचे इतर १२ शिक्षक उपस्थित होते. या सर्व गुरुजनांचा यथोचित सन्मान २००५ बॅचच्या विद्यार्थ्यांनी केला. त्यांच्याप्रती सर्व शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत व आपण सध्या काय करत आहोत, याची माहिती दिली. ही माहिती देताना सर्व विद्यार्थी खूप आनंदात होते
दिवसभर विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, संगित खुर्ची, फनी गेम्स या माध्यमातून माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आपल्या शाळेतील मौजमजा आपल्या सर्व मित्र मैत्रिणीसोबत २० वर्षानंतर परत एकदा अनुभवली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.