सुप्रसिद्ध युवा किर्तनकार ह.भ.प. अमोल महाराज सुळ, मोरोची यांचे सुश्राव्य किर्तन माळशिरस येथे होणार…
स्व. ज्ञानदेव उर्फ देना देशमुख यांच्या धर्मपत्नी माळशिरसचे उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांच्या मातोश्री तर गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेवराव देशमुख यांच्या भावजय श्रीमती मिनाबाई देशमुख यांचे प्रथम पुण्यस्मरण.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस शहरातील सुप्रसिद्ध पैलवान स्वर्गीय ज्ञानदेव उर्फ देना देशमुख यांच्या धर्मपत्नी माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष शिवाजीराव ज्ञानदेव देशमुख यांच्या मातोश्री तर गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेवराव देशमुख यांच्या भावजय स्वर्गीय श्रीमती मिनाबाई ज्ञानदेव देशमुख यांचे सोमवार दि. २९ ऑगस्ट २०२२ रोजी प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार ह.भ.प. अमोल महाराज सूळ, मोरोची यांचे सुश्राव्य कीर्तन माळशिरस येथील देशमुख पट्टा ६१ फाटा, अकलूज माळशिरस रोडवर दहादरे या ठिकाणी सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये होणार आहे. कीर्तनानंतर पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन माळशिरस नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख आणि देशमुख परिवार माळशिरस यांच्यावतीने करण्यात येत आहे.
माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार गोपाळराव देशमुख यांना ज्ञानदेव, एकनाथ, सोपान, निवृत्ती, पांडुरंग व महादेव अशी सहा मुले होती. माळशिरस शहरात कुस्तीची परंपरा जोपासली जात आहे. ज्ञानदेव उर्फ देना देशमुख यांनी कुस्ती क्षेत्रामध्ये दैदिप्यमान कामगिरी करून माळशिरसचे नाव पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यामध्ये केले होती. कुस्तीतील बिजली मल्ल अशी त्यांची ओळख झालेली होती. सुप्रसिद्ध पैलवान म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचा १९८० साली सांगली येथील शंकर पाटील यांची कन्या मिनाबाई पाटील यांच्याशी विवाह झालेला होता. ज्ञानदेव व मिनाबाई यांना पहिली कन्या विजया झालेली होती. १९८३ साली शिवाजी यांचा जन्माच्या अगोदर तीन महिने ज्ञानदेव देशमुख यांचा मृत्यू झालेला होता. शिवाजीराव देशमुख यांनी वडिलांचे तोंड सुद्धा पाहिलेले नव्हते. मात्र वडिलांचे कार्य कर्तुत्व ऐकलेले होते. स्वर्गीय ज्ञानदेव उर्फ देना देशमुख यांचे सांगली जिल्ह्यात पुतळे उभा केलेले आहेत. शिवाजी यांनी आजोबा गोपाळराव पाच चुलते यांच्या मार्गदर्शनाखाली समाजामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.
कुस्ती क्षेत्राबरोबर इतर उद्योग व्यवसाय करून आपली प्रगती साधत चालले होते. मिनाबाई जिवंत असताना आपल्या मुलाबद्दल त्यांच्या मनामध्ये अभिमान होता. गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेवराव देशमुख यांनी शिवाजी यास वेळोवेळी सहकार्य करून वडिलांची उणीव कधीच भासू दिलेली नव्हती. मुलासारखे प्रेम शिवाजीवर केलेले होते. शिवाजी सर्वच चुलत्यांच्या छत्र छायेखाली स्वर्गीय ज्ञानदेव उर्फ देना देशमुख यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजामध्ये वावरत असतात मातोश्रीच्या निधनानंतर माळशिरस नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष पदावर विराजमान झालेले होते. शिवाजीराव यांनी राजकारणामध्ये सर्वोच्च पदावर विराजमान होत असताना आई-वडील यांना पाहता आले नाही, याचे मनामध्ये कायम शल्य होते. पण याची उणीव मात्र, चुलत्या आणि चुलते यांनी कधीही भासू दिली नाही. शेवटी ईश्वर सत्ये पुढे इलाज नाही.
गेल्या वर्षी मीनाबाई देशमुख यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तरी मित्रपरिवार नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख व देशमुख परिवार यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng