आषाढी वारी निमित्त उत्कृष्ट नियोजन केलेले तालुक्यातील महसुल अधिकारी व पोलीस प्रशासन अधिकारी यांचा ओम श्री गोरखनाथ सामाजीक प्रतिष्ठान यांच्यावतीने सन्मान

उपविभागीय अधिकारी पांगारकर मॅडम, तहसिलदार सुरेश शेजुळ, नायब तहसिलदार अमोल कदम, डीवायएसपी शिरगांवकर व पोलीस निरिक्षक निरज उबाळे आदींचा सन्मान
तांबवे (बारामती झटका)
मंगळवार दि. १५/७/२०२५ रोजी तांबवे येथिल ओम श्री गोरखनाथ सामाजीक प्रतिष्ठान, तांबवे यांच्यावतीने आषाढी वारी निमित्त उत्कृष्ट नियोजन केलेले तालुक्यातील महसुल अधिकारी व पोलीस प्रशासन अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये उपविभागीय अधिकारी पांगारकर मॅडम, तहसिलदार सुरेश शेजुळ, नायब तहसिलदार अमोल कदम, अकलूज पोलीस स्टेशनचे डी. वाय. एस. पी. शिरगांवकर व अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक निरज उबाळे आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

या सर्वांचा सन्मान तांबवे गावातील ओम श्री गोरखनाथ सामाजिक प्रतिष्ठान यांच्यावतीने अध्यक्ष दादा महाराज साठे यांच्या हस्ते करण्यात आला.
यविधी उपविभागीय अधिकारी पांगारकर यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, समाजामध्ये सामाजीक जाणीव असणाऱ्या संस्था आजही आहेत. असे म्हणत संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी ॲड. प्रमोद कुलकर्णी, पोपट नरूटे, नवनाथ जाधव, दुर्योधन आडके, बापू चव्हाण, राहुल जाधव, राम ढोबळे, अनिल चव्हाण, प्रभाकर माने देशमुख, विश्वजीत साठे, शहाजी काळे, अभिजीत केंगार, ॠषिकेश देशमाने, संभाजी चव्हाण आदी उपस्थीत होते. यावेळी सर्वांनी या कार्यक्रमास वेळ दिल्याबद्दल प्रशांत कोळेकर व सचिन कांबळे यांनी आभार मानले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



